scorecardresearch

Hero Splendor Plus केवळ २० ते २७ हजारांच्या बजेटमध्ये, जाणून घ्या ऑफर

जे कमी किमतीत जास्त मायलेज देतात, अशा बाइक्सना बाइक सेगमेंटमध्ये सर्वाधिक मागणी आहे. आज आपण Hero Splendor Plus बद्दल बोलत आहोत.

Hero-Splendor-Plus
(फोटो-DROOM)

जे कमी किमतीत जास्त मायलेज देतात, अशा बाइक्सना बाइक सेगमेंटमध्ये सर्वाधिक मागणी आहे. आज आपण Hero Splendor Plus बद्दल बोलत आहोत.

Hero Splendor Plus त्याच्या स्टाईल आणि मायलेजसाठी पसंत केला जाते. जर तुम्ही ती शोरूममधून खरेदी केली तर यासाठी तुम्हाला ६५,६१० ते ७०,७९० रुपये खर्च करावे लागतील.

पण आज आम्ही तुम्हाला अशा ऑफर्सची माहिती देत ​​आहोत, ज्यामध्ये तुम्ही ही बाईक केवळ २० ते २७ हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करून ती घरी घेऊन जाऊ शकाल. Hero Splendor Plus वरील आजच्या ऑफर एका वेबसाइटवर आहे जी सेकंड हँड दुचाकी ऑनलाइन विकते.

हिरो स्प्लेंडर प्लस वरील आजची पहिली ऑफर BIKEDEKHO वेबसाइटवरून आली आहे ज्याने बाइकचे 2014 मॉडेल विक्रीसाठी पोस्ट केले आहे. पण या बाइकसोबत कोणतीही ऑफर किंवा प्लॅन दिला जात नाही.

Hero Splendor Plus वर दुसरी ऑफर DROOM वेबसाइटवरून आली आहे ज्याने साइटवर बाइकचे 2011 मॉडेल पोस्ट केले आहे आणि त्याची किंमत २५,००० रुपये निश्चित केली आहे. ही बाईक खरेदी केल्यावर तुम्हाला एक फायनान्स प्लॅन मिळेल.

Hero Splendor Plus चे 2014 चे मॉडेल CREDR वेबसाइटवर २७,०७५ च्या किमतीत विक्रीसाठी पोस्ट केले आहे. ही बाईक खरेदी करताना कंपनी कोणताही प्लॅन देत नाहीये.

आणखी वाचा : Renault Triber Limited Edition: मोठ्या कुटुंबासाठी ७९ हजारांच्या छोट्या डाउन पेमेंटवर घरी घेऊन जा ही MPV

Hero Splendor Plus वर उपलब्ध असलेल्या ऑफर्सची संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर, तुम्ही या बाईकच्या इंजिनपासून ते फिचर्ससंपूर्ण डिटेल्स जाणून घेऊ शकता.

बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात 97.2 cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे 8.2 PS पॉवर आणि 8.05 Nm पीक टॉर्क जनरेट करते आणि या इंजिनसह 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

ब्रेकिंग सिस्टिमबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या पुढच्या आणि मागील दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक्स बसवण्यात आले आहेत, ज्यामध्ये अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही Hero Splendor Plus बाईक 80.6 kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Second hand hero splendor plus from 20 to 27 thousand with finance plan read full details prp

ताज्या बातम्या