Electric Scooter Price Cut: इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी Bounce Infinity ने त्यांच्या E1+ स्कूटरवर २१ टक्क्यांची प्रचंड सूट जाहीर केली आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत २४ हजार रुपयांनी कमी केली आहे. आता ही इलेक्ट्रिक स्कूटर फक्त ८९ हजार ९९९ रुपये (एक्स-शोरूम) मध्ये उपलब्ध असेल. मात्र, ही ऑफर काही काळासाठी आहे. जर तुम्हाला या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला लवकरच स्कूटर खरेदी करावी लागेल. त्यामुळे जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे.

इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी Bounce Infinity ने त्यांच्या E1+ स्कूटरवर २१ टक्क्यांची प्रचंड सूट जाहीर केली आहे. आता ही इलेक्ट्रिक स्कूटर फक्त ८९ हजार ९९९ रुपये (एक्स-शोरूम) मध्ये उपलब्ध असेल, जी आधीच्या किमतीपेक्षा २४,००० रुपये कमी आहे. या इलेक्ट्रिकची किंमत १.१३ लाख रुपये होती. तसेच, ही ऑफर केवळ ३१ मार्च २०२४ पर्यंत वैध आहे. आपण इच्छित असल्यास, आपण बुक करू शकता.

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
Sensex eight hundredth retreat due to concerns over US inflation protracted tariff cuts
अमेरिकेतील महागाई, लांबलेल्या दरकपातीच्या चिंतेने ‘सेन्सेक्स’ची आठ शतकी माघार
Do you know the beginnings of Gmail
जीमेलची सुरुवात आणि एप्रिल फूल कनेक्शन तुम्हाला माहित्येय का?
Vacancies 2024 Intelligence Bureau Recruitment For 660 Various Posts Read For How to Apply and Other Details Her
IB Recruitment 2024: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी! ‘या’ ६६० पदांसाठी बंपर भरती सुरू, जाणून घ्या सविस्तर

(हे ही वाचा : मारुतीच्या ‘या’ स्वस्त सेडान कारची धडाक्यात विक्री; Verna, Amaze सह सर्वांना टाकलं मागे, मायलेज ३१ किमी, किंमत फक्त…)

वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन बुक करा

जर तुम्हाला ही इलेक्ट्रिक स्कूटर बुक करायची असेल तर तुम्ही ५०० रुपये भरून कंपनीच्या वेबसाइटवर स्कूटर बुक करू शकता.

बाउन्स इन्फिनिटी E1+ ई-स्कूटर मध्ये काय आहे खास

वैशिष्ट्यांबद्दल बोलताना, E1+ इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये १.९ kWh लिथियम-आयन बॅटरी आहे. या स्कूटरमध्ये पॉवर मोड, रिव्हर्स मोड, क्रूझ कंट्रोल आणि ड्रॅग मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या स्कूटरचा टॉप स्पीड ताशी ६५ किमी आहे. या मॉडेलची रेंज ७० किमीपेक्षा जास्त असल्याचा कंपनीचा दावा आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर पाच कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

कंपनीला ३०,००० हून अधिक स्कूटरच्या ऑर्डर मिळाल्या

या स्कूटरमध्ये लिक्विड-कूल्ड बॅटरी तंत्रज्ञान आहे, जे जलद चार्जिंग, चांगली रेंज आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटी देते. सध्या कंपनीच्या देशभरात ७० पेक्षा जास्त डीलरशिप आहेत, जिथून तुम्ही ही स्कूटर खरेदी करू शकता. अलीकडेच कंपनीला सन मोबिलिटीकडून ३०,००० हून अधिक स्कूटरची ऑर्डर मिळाली आहे.