Harley-Davidson ची पहिली मेड-इन-इंडिया सर्वात स्वस्त बाईक नुकतीच देशात दाखल करण्यात आली होता. ‘Harley-Davidson X440’ असं या बाईकचं नाव आहे. ४४० सीसी क्षमतेच्या या गाडीला तीन लाखांहून कमी किंमतीत लाँच केल्यामुळे या बाईकला चांगलीच बुकींग मिळाली आहे.

Harley-Davidson India ने घोषणा केली आहे की, X440 साठी प्रास्ताविक किमतीत ऑनलाइन बुकिंग ३ ऑगस्ट २०२३ रोजी बंद होईल. ३ जुलैपासून याचं ऑनलाईन बुकिंग सुरू झालं होतं. Harley-Davidson X440 हे Hero MotoCorp च्या सहकार्याने विशेषतः भारतीय बाजारपेठेसाठी विकसित केले गेले आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत २.२९ लाख ते २.६९ लाख रुपये आहे. या किमतीच्या श्रेणीतील ही सर्वात स्वस्त हार्ले मोटरसायकल देखील आहे.

(हे ही वाचा : देशात धडाधड विक्री होणाऱ्या अन् १ लिटर पेट्रोलमध्ये ७० किमी धावणाऱ्या बाईकला १८ हजारात आणा घरी! )

Hero MotoCorp ३ ऑगस्टपासून X440 चे बुकिंग तात्पुरते थांबवेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांना मोटारसायकलसाठी ‘उत्कृष्ट प्रतिसाद’ मिळाला आहे परंतु कंपनीने नेमकी किती ऑर्डर प्राप्त केली हे उघड केलेले नाही. X440 साठी बुकींगचा पुढचा टप्पा कधी उघडेल हे Hero ने अजून जाहीर केलेले नाही पण जेव्हा ते होईल तेव्हा किमती वाढतील, अशी अपेक्षा केली जाऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Harley-Davidson X440 मध्ये कंपनीने ४४०CC ऑइल-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन दिले आहे, जे ६-स्पीड गिअरबॉक्ससह ट्यून केले जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे इंजिन ३० bhp पॉवर आणि ४० Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते.