scorecardresearch

Hero Destini 125 vs Honda Activa 125: मायलेज आणि किंमत जाणून घ्या

दुचाकी क्षेत्रात स्कूटरची मोठी रेंज आहे. मायलेज स्कूटरपासून ते स्पोर्टी डिझाइन आणि हायटेक फिचर्ससह स्कूटर उपलब्ध आहेत.

Hero-Destini-125-vs-Honda-Activa-125
Hero Destini 125 vs Honda Activa 125: मायलेज आणि किंमत जाणून घ्या (फोटो HERO, HONDA)

दुचाकी क्षेत्रात स्कूटरची मोठी रेंज आहे. मायलेज स्कूटरपासून ते स्पोर्टी डिझाइन आणि हायटेक फिचर्ससह स्कूटर उपलब्ध आहेत. जर तुम्हाला स्वतःसाठी लांब मायलेज असलेली स्टायलिश स्कूटर खरेदी करायची असेल, तर येथे दोन लोकप्रिय स्कूटरचे तपशील दिले आहेत, जाणून घेऊयात. हिरो Destini 125 आणि होंडा Activa 125 या दोन स्कूटर तुलनेसाठी आहेत. या दोन्ही गाड्यांच्या किंमतीपासून ते फीचर्सपर्यंत संपूर्ण माहिती मिळेल.

Honda Activa 125: होंडा अ‍ॅक्टिव्हा ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. कंपनीने पाच प्रकारांसह बाजारात लॉन्च केली आहे. या स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये १२४ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ८.२९ पीएस पॉवर आणि १०.३ एनएम पीक टॉर्क जनरेट केलं असून ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला जोडलं जातं. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल सांगायचे तर, कंपनीने पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे. या स्कूटरच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, होंडा अ‍ॅक्टिव्हा 125 ६० किलोमीटरचा मायलेज देत असून ARAI द्वारे प्रमाणित आहे. होंडा अ‍ॅक्टिव्हा 125 ची सुरुवातीची किंमत ७४,९८९ रुपये असून टॉप व्हेरियंटवर जाताना ८३,१६२ रुपयांपर्यंत जाते.

Top 3 MPV: सात सीटर कार खरेदी करायची आहे? ‘या’ गाड्यांना सर्वाधिक मागणी

Hero Destini 125: हिरो डेस्टिनी 125 कंपनीची सर्वाधिक विकल्या जाणार्‍या स्कूटरपैकी एक आहे. नुकतीच कंपनीने एक्सटेक अवतारात लाँच केली आहे. या स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे तर, यात १२४.६ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जे एअर कूल्ड फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ९.१ पीएस पॉवर आणि १०.४ एनएम पीक टॉर्क जनरेट करते आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल सांगायचे तर, कंपनीने त्याच्या पुढील आणि मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे. मायलेजबद्दल, हिरो दावा करतो की ही स्कूटर ५४ किमीचा मायलेज देत असून ARAI द्वारे प्रमाणित आहे. हिरो डेस्टिनी 125 ची सुरुवातीची किंमत ६९,९९० रुपये आहे. टॉप व्हेरियंटमध्ये जाताना ८०,६९० रुपयांपर्यंत जाते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hero destini 125 vs honda activa 125 find out the mileage and price rmt

ताज्या बातम्या