Hero Bike, Scooter Price Hike: तुम्ही देखील Hero ची नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदीचा विचार करत असला तर तुम्हाला आता नवीन बाईक आणि स्कूटर खरेदीसाठी जास्त खिसा रिकामा करावा लागणार आहे. Hero Motocorp ने ग्राहकांना धक्का देत आपल्या बाईक्स आणि स्कूटरच्या किमतीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. ‘या’ दिवशीपासून Hero Motocorp बाईक्स आणि स्कूटरवर नवीन दर लागू होणार आहे.

‘या’ दिवशीपासून Hero बाईक्स आणि स्कूटर होणार महाग

भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक Hero MotoCorp ने घोषणा केली आहे की, कंपनी १ एप्रिल २०२३ पासून त्यांच्या लाइन-अप (मोटारसायकल आणि स्कूटर) च्या किमती वाढवेल. पुढील महिन्यापासून हिरोची निवडक उत्पादने २ टक्क्यांपर्यंत महाग होतील. तथापि, मॉडेल आणि बाजारपेठेनुसार दरवाढ बदलू शकते. अशा परिस्थितीत हिरोच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईक स्प्लेंडरच्या किमतीही वाढू शकतात, त्याच्या किमती जास्तीत जास्त २ टक्क्यांनी वाढू शकतात. हिरोच्या पोर्टफोलिओमधील हे सर्वात महत्त्वाचे उत्पादन आहे.

Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
Mumbai, Get Respite Sweltering, Mumbai Get Respite Heat, Temperatures Drop, 34 Degrees, mumbai summer, summer news, summer in mumbai, summer temperature in mumbai, mumbai heat, mumbai sweltering, mumbai Temperature, mumbai news, summer news,
मुंबईकरांची काहिली कमी होणार
World Art Day Art and Income Source in Marathi
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल; पण कलेशी केलेली मैत्री…आयुष्य समृद्ध करणाऱ्या कलेमुळे तुमच्या करिअरला मिळू शकते नवी दिशा
woman exposes scammers who posed as police officer on instagram watch viral video
VIDEO : “तुझी बहीण आमच्या ताब्यात; तिला सोडव नाही, तर…”; पोलिसांच्या नावे येणाऱ्या ‘अशा’ कॉल्सपासून राहा सावधान!

(हे ही वाचा : तारीख ठरली! Ola, Hero चा बँड वाजवायला होंडा देशात आणतोय नवी इलेक्ट्रिक स्कूटर )

किमती वाढविण्याचे कारण काय?

Hero MotoCorp च्या मते, OBD-II नियमांची पूर्तता करण्यासाठी केलेले बदल हे किमती वाढण्याचे मुख्य कारण आहे. एका अधिकृत निवेदनात, कंपनीने म्हटले आहे की, “OBD-II संक्रमणामुळे किंमती वाढल्यामुळे किंमतींमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. Hero MotoCorp ग्राहकांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा उपाय ऑफर करत राहील.”

हिरोने नुकतीच लाँच केली उत्पादने

Hero MotoCorp ने अलीकडेच भारतात ऑल न्यू झूम 110 (Xoom 110) लाँच केले आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत ६८,५९९ रुपये आहे. ही एक वैशिष्ट्यपूर्ण स्कूटर आहे. होंडा अ‍ॅक्टिव्हा एच-स्मार्ट आणि टीव्हीएस ज्युपिटर यांसारख्या स्कूटरशी त्याची स्पर्धा आहे. कंपनीने सुपर स्प्लेंडरचा नवीन हाय-टेक XTEC प्रकार देखील सादर केला आहे. ८३,३६८ एक्स-शोरूम किंमतीत, यात एलईडी हेडलॅम्प, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इत्यादी वैशिष्ट्ये आहेत.