केवळ ९ हजार देऊन घरी घेऊन जा Honda Activa 6G चं व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज, फीचर्स आणि संपूर्ण फायनान्स प्लॅन | Loksatta

यंदाच्या सणासुदीच्या मोसमात केवळ ९ हजार देऊन घरी घेऊन या Honda Activa 6G चं ‘हे’ व्हेरिएंट; जाणून घ्या संपूर्ण फायनान्स प्लॅन

Honda Activa 6G आतापर्यंत तीन व्हेरिएंटमध्ये बाजारात लॉंच करण्यात आली आहे. आज आपण या तीन व्हेरिएंटमधील डीलक्स या व्हेरिएंटबद्दल जाणून घेऊया.

यंदाच्या सणासुदीच्या मोसमात केवळ ९ हजार देऊन घरी घेऊन या Honda Activa 6G चं ‘हे’ व्हेरिएंट; जाणून घ्या संपूर्ण फायनान्स प्लॅन
Honda Activa 6G DLX फायनान्स प्लॅन (Honda)

दुचाकी वाहनांच्या स्कुटर सेगमेंटमध्ये होंडा अ‍ॅक्टिव्हा ही सर्वांत लोकप्रिय आणि विश्वासार्ह स्कुटर आहे. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांपासून होंडा अ‍ॅक्टिव्हा ६जी (Honda Activa 6G) देशातील बेस्ट सेलिंग स्कुटर ठरली आहे. ही स्कुटर आतापर्यंत तीन व्हेरिएंटमध्ये बाजारात लॉंच करण्यात आली आहे. आज आपण या तीन व्हेरिएंटमधील डीलक्स या व्हेरिएंटबद्दल जाणून घेऊया.

होंडा अ‍ॅक्टिव्हा ६जी डीलक्स या स्कुटरची मुंबईतील एक्सशोरूम किंमत ७६,७०५ रुपये इतकी आहे, तर तिची ऑन रोड किंमत ९१,३१९ रुपये इतकी असू शकते. मात्र तुम्ही केवळ नऊ हजार रुपये देऊन ही गाडी आपल्या घरी घेऊन येऊ शकता.

Photos : २०२३ च्या स्वागतासाठी Tata Motors सज्ज; पाहा आगामी नव्या गाड्यांची संपूर्ण लिस्ट!

Honda Activa 6G DLX मधील फीचर्स

कंपनीने होंडा अ‍ॅक्टिव्हा ६जी डीलक्समध्ये १०९.५१ सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ७.७९ पीएसची पॉवर आणि ८.८४ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच, या इंजिनसह ऑटोमैटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. मायलेजच्या बाबतीत कंपनीचा असा दावा आहे की ही स्कुटर प्रतिलीटर ६० किमीचे मायलेज देते. हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे. त्याचबरोबर, या स्कुटरच्या पुढच्या आणि मागील दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. यासह स्पोक व्हील आणि ट्यूबलेस टायरही जोडण्यात आले आहेत.

पेट्रोल-डिझेलचे दर

Honda Activa 6G DLX फायनान्स प्लॅन

या सणासुदीच्या मोसमात होंडा अ‍ॅक्टिव्हा ६जी विकत घेण्यासाठी तुम्ही लोन घेणार असाल तर बँकेकडून तुम्हाला या स्कुटरसाठी ७७,४३६ रुपयांचे लोन मिळू शकते. यावर ९.७% प्रतिवर्ष या दरानुसार व्याज भरावे लागेल. हे लोन मिळाल्यानंतर तुम्ही केवळ ९ हजार रुपये डाउन पेमेंट म्हणून भरावे लागतील. यानंतर प्रति महिना तुम्हाला २,४८८ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. या लोनची पूर्तता करण्याचा अवधी ३ वर्षांचा आहे.

(वरील दर सूचक आहेत. त्यात जीएसटी आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्याजवळील शोरूममध्ये संपर्क साधा.)

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘या’ आहेत जगातील सर्वात वेगवान कार्स, लुक पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

संबंधित बातम्या

१० सेकंदात हायस्पीड, १६० किमी मायलेज.. टाटा ‘नॅनो’ इलेक्ट्रिक कार बाजारात येणार? किंमत किती?
आर्मी टॅंकसारखा लूक, निवडणूक प्रचार अन्…; पवन कल्याण यांची खास गाडी पाहिली का?
कारच्या कर्जाची चिंता सतावतेय? ‘या’ सोप्या टिप्स करतील तुमची मदत
Yamaha स्कूटरवर बंपर कॅशबॅक ऑफर; जाणून घ्या अधिक तपशील
Jeep Meridian: ७ सीटर एसयूव्हीचे भारतात अनावरण; जाणून घ्या फीचर्स आणि अन्य तपशील

व्हिडिओ

ताज्या बातम्या
नेयमार मैदानात कधीच दिसणार नाही? FIFA World Cup मधून ब्राझील अनपेक्षितरित्या बाहेर पडल्यानंतर म्हणाला, “हा शेवट आहे असं…”
“हे अकलेचे कांदे…”, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांचा टोला; म्हणाले, “तुमच्या तिजोरीत येणारे पैसे…”
IND vs BAN 3rd ODI: नाणेफेक जिंकून बांगलादेशचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
पुण्यात ५१ पादचारी सिग्नल बसविण्याचा प्रस्ताव धूळ खात
‘विकी डोनर २’बद्दल आयुष्मान खुरानाचा मोठा खुलासा, म्हणाला…