कमी खर्चात अधिक मायलेज मिळत असल्याने ग्राहकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. मागणी वाढल्यामुळे अनेक कंपन्या ई वाहन उपलब्ध करत आहेत. EICMA २०२२ ऑटो शोमध्ये होंडाने आपला नवा स्कुटर EM1e सादर केला आहे. कंपनीकडून युरोपीयन बाजारपेठेत सादर होणारे हे पहिले दुचाकी वाहन आहे.
हा स्कुटर २०२३ मध्ये उन्हाळ्यात उपलब्ध होईल. हा स्कुटर आधी युरोपमध्ये उपलब्ध होईल. भारतात हा स्कुटर कधी उपलब्ध होईल याची माहिती मिळालेली नाही. ईएम१ ई चे डिझाईन फ्युचरिस्टिक वाटते. स्कुटरचे इंडिकेटर हँडलबारवर बसवण्यात आले आहेत. तर, एलईडी हेडलँप स्कुटरच्या पुढील भागात असलेल्या एप्रोनमध्ये बसवण्यात आला आहे.
पाय ठेवण्यासाठी वापरले जाणारे फुटपेग स्कुटरमध्ये उत्तमरित्या बसवण्यात आले आहेत. ही स्कुटर लहान सहलींसाठी डिजाईन करण्यात आली आहे. त्यामुळे सिंगल चार्जमध्ये स्कुटर केवळ ४० किमीची रेंज देते. स्कुटरचे बॅटरी पॅक विविध हवामान, आर्द्रता पातळी, प्रभाव आणि कंपन सहन करू शकेल असे डिजाईन करण्यात आले आहे. स्कुटर स्वॅपेबल बॅटरी फीचरसह येते. याद्वारे तुम्ही स्कुटरमधून बॅटरी काढून ती घरी चार्ज करू शकता.
(४ रुपयांत करा १०० किमीचा प्रवास, घेऊन ‘या’ ही स्वस्त ई सायकल)
होंडा सीएल ५०० सादर
ईएम१ ई स्कुटरबरोबर होंडाने नवीन सीएल ५०० देखील सादर केली आहे. इटलीमध्ये EICMA 2022 या ऑटो शोचे आयोजन करण्यात आले आहे. या शोमध्ये रॉयल इन्फिल्डने आपली बहुप्रतीक्षित क्रुजर बाईक सुपर मिटियोर ६५० सादर केली होती. याच शोमध्ये होंडाने आपली नव्या स्क्रॅम्बलरून पर्दा हटवला आहे. Honda CL 500 असे या बाईकचे नाव आहे.
होंडा सीएल ५०० ही साठ आणि सत्तरच्या दशकातील बाईक्सपासून प्रेरित आहे. खडबडीत रस्त्यांवर चांगली कामगिरी करण्यासह शहरामध्ये चालवता येण्यासाठी ऑफ रोड डायनामिकसह हल्की बाईक निर्माण करण्याचा निर्मात्यांचा हेतू होता.
फीचर
बाईकमध्ये ट्युबसारखी स्टील ट्रेलिस शैलीची मुख्य फ्रेम मिळते. बाईकमध्ये लाँग ट्रॅव्हल सस्पेन्शन देण्यात आले आहेत. पुढील भागात ४१ एमएमचे टेलिस्कोपिक फोर्क आणि परिस्थितीशी जुळवून घेणारे अॅडजस्टेबल रिअर शॉकअप्स देण्यात आले आहेत. पुढील व्हील १९ इंचचा असून मागील व्हील १७ इंचचा आहे. होंडाने ब्लॉक पॅटर्न टायर्सचा वापर केला आहे. बाईकच्या पुढील आणि मागिल चाकांतील ब्रेक्स एबीएस तंत्रज्ञानाने सूसज्ज आहे. विविध पृष्ठभागांवर आणि ऑफ रोडींगवर चांगली कामगिरी करण्यासाठी ते मदत करतील.