आजच्या घडीला कार सगळ्यांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. अगदी महागड्या गाड्या परवडत नसल्या तरी लोकांकडे आहेत. आजकाल प्रत्येक घरात कार असणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. तुम्ही कोणत्याही लहान शहरात गेलात तरी तुम्हाला सर्वत्र गाड्या दिसतील. जेव्हापासून लोकांना कर्जाची सुविधा मिळू लागली, तेव्हापासून लोकांसाठी कार खरेदी करणे सोपे झाले आहे. या प्रकरणात, तुम्हाला कारचे चांगले ज्ञान असेल. पण तुम्हाला माहिती आहे का की, सुमो पैलवान आहेत, मग गाडीला हे नाव कसे पडले? भारतातील पहिली कार कोणती आहे आणि ती कोणी बनवली? नाही माहित ना, चला तर जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर…
भारतातील पहिली कार कोणती?
भारतात, हिंदुस्थान मोटर्सने सर्वप्रथम कोलकाता येथे अॅम्बेसेडर कारचे उत्पादन सुरू केले. पण त्यावेळी त्यांना तांत्रिक बाबींमध्ये लंडनच्या मॉरिस मोटर्सची मदत घ्यावी लागली. भारतात बनलेली असूनही, लंडनच्या मॉरिस मोटर्सच्या मदतीमुळे अॅम्बेसेडर कार पूर्णपणे स्वदेशी कार नव्हती. भारतातील पहिली स्वदेशी कार टाटा समूहाने बनवली होती. टाटाने १९९८ च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये आपली इंडिका कार लाँच केली होती. जी पहिली स्वदेशी कार मानली गेली आणि ही कार १९९९ मध्ये बाजारात दाखल झाली.
(हे ही वाचा : ‘या’ ५.५० लाखाच्या कारसमोर Alto-Celerio ही विसरुन जाल, बाजारात आहे तुफान क्रेझ, मायलेज ३४ किमी )
सुमो नाव कसे पडले?
टाटा सुमो कार गेंडयासारखी दिसणारी आणि अतिशय शक्तिशाली कार दिसत असल्याने म्हणूनच कारचे नाव जपानी सुमो कुस्तीपटूंच्या नावावर आहे, असे अनेकांना वाटायचे, पण असे अजिबात नाही. सुमो हा जपानमध्ये खेळला जाणारा एक पारंपरिक खेळ आहे. सुमो कारचे नाव टाटा मोटर्सचे माजी एमडी सुमंत मूळगावकर यांच्या नावावर आहे. त्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या नावाची दोन अक्षरे एकत्र करून सुमोचे नाव ठेवण्यात आले.