वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलयं. पेट्रोलच्या किमतींनी तर आकाश गाठलयं अशात तुमच्याकडे गाडी असेल आणि ती पेट्रोलवर चालणारी असेल तर मात्र डोकेदुखीच वाटू लागलेय. अशा वेळी सीएनजी गाड्यांकडे ग्राहकांचा कल सध्या वाढताना दिसतोय. आता पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे त्रासलेल्यांसाठी, देशातील सर्वाधिक पसंतीची एसयुव्ही ह्युंदाई क्रेटा येत्या काळात मोठा धमाका करणार आहे. मिड एसयुव्ही सेगमेंटमधील क्रेटाची सीएनजी आवृत्ती आणण्याच्या तयारीत कंपनी आहे. Hyundai Creta CNG व्हेरिएंट चाचणी दरम्यान अनेक वेळा पाहण्यात आली आहे, याद्वारे टाटा, मारुतीला टक्कर देण्याची तयारी सुरु झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Hyundai Creta CNG काय असेल खास ?

Hyundai Creta CNG च्या इंजिन आणि ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाल्यास, रिपोर्ट्सनुसार, Hyundai Motors या SUV मध्ये १.४ लीटर पेट्रोल इंजिन इन्स्टॉल करणार आहे. हे इंजिन १३८ Bhp पॉवर आणि २४२ एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते परंतु CNG किटमध्ये गेल्यानंतर या इंजिनची पॉवर आणि पीक टॉर्क कमी होईल. या इंजिनमध्ये फक्त ६ स्पीड मॅन्युअल पर्याय अपेक्षित आहे.

फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, रिपोर्ट्सनुसार, सध्याच्या मॉडेलमध्ये उपलब्ध असलेल्या Hyundai Creta CNG मध्ये हेच फीचर्स दिले जातील. या वैशिष्ट्यांमध्ये १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ७-इंच सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरामिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जर, पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, समोर हवेशीर सीट, स्वयंचलित हवामान नियंत्रण, क्रूझ कंट्रोल यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

(आणखी वाचा : महिंद्राची ‘ही’ कार ठरली जगातील सर्वोत्तम वेगवान इलेक्ट्रिक कार; गाडीने केलाय वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा कशी दिसते ही कार )

Hyundai Creta CNG मधील सुरक्षा वैशिष्‍ट्ये देखील विद्यमान वैशिष्‍ट्ये सारखीच असतील, जी सहा एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्‍टम, इलेक्ट्रॉनिक स्‍थिरता नियंत्रण, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, EBD सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्‍टम यासारखी वैशिष्ट्ये आहेत.

(आणखी वाचा : Auto Expo 2023: नवीन कार खरेदी करायच्या विचारात आहात? मारुतीसह ‘या’ कंपनीच्या कार बाजारात करणार धमाल)

Hyundai Creta CNG किंमत

अहवालांनुसार, Hyundai ही CNG SUV जानेवारी ऑटो एक्स्पो २०२३ पर्यंत लाँच करू शकते. किमतीबद्दल बोलायचे झाले तर Hyundai Creta CNG ची किंमत सध्याच्या व्हेरियंटपेक्षा ५० ते ७५ हजार रुपये जास्त असणार आहे.क्रेटा सीएनजी टोयोटा हायरायडरला टक्कर देईल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyundai creta cng india will be launched at auto expo 2023 this car was seen during the test pdb
First published on: 01-12-2022 at 18:47 IST