गेल्या काही महिन्यात भारतातील प्रवासी वाहन सेगमेंटमध्ये खूप चांगली सुरुवात पाहायला मिळत आहे. सध्या, SUV कार ही देशातील बहुतांश ग्राहकांची पहिली पसंती आहे. त्यामुळे कार उत्पादक कंपन्या या  SUV वरअधिक लक्षकेंद्रीत करत आहेत. त्यामुळे बाजारात SUV कारच्या ऑप्शन्सची संख्या सातत्याने वाढत आहे. भारतातील SUV विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. अशाच एका एसयुव्ही कारने विक्रीत मोठा विक्रम केला आहे.

‘या’ कारला भारतीय बाजारात मोठी मागणी

Hyundai Creta भारतात पहिल्यांदा २०१५ मध्ये लाँच करण्यात आली होती. लाँच झाल्यापासून ही कार भारतीय खरेदीदारांमध्ये लोकप्रिय झाली आहे. या कारच्या विक्रीला सुरुवातीपासूनच गती मिळाली होती, जी आताही कायम आहे. आता Hyundai कडून माहिती देण्यात आली की क्रेटाच्या एकूण १० लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. याचा अर्थ, गेल्या ९ वर्षांत, जवळजवळ प्रत्येक ५ मिनिटांनी एक Hyundai Creta विकली गेली आहे.

The debut of Bharti Hexacom itself gave investors a return of 43 percent
‘भारती हेक्साकॉम’चा पदार्पणालाच गुंतवणूकदारांना ४३ टक्क्यांचा परतावा
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
Best Selling 7 Seater Car
Innova ना Fortuner मारुतीच्या ‘या’ स्वस्त ७ सीटर कारसमोर सर्वांची बोलती बंद; दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
Hero MotoCorp sales
बाकी कंपन्यांची उडाली झोप, Hero ची बाजारपेठेत ‘हिरोगीरी’; विक्रीत मोठी वाढ, बाईक खरेदीसाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा

(हे ही वाचा : २०२४ मध्ये टाटाने खेळला नवा गेम; ट्विन सिलिंडरसह आणली स्वस्त कार, मायलेज २६ किमी, किंमत फक्त…)

सध्या, Hyundai Creta त्याच्या दुसऱ्या पिढीमध्ये आहे आणि आतापर्यंत अनेक वेळा अपडेट केले गेले आहे. जुलै २०१५ मध्ये लाँच झालेली Hyundai Creta ऑगस्ट २०१८ पर्यंत बाजारात राहिली, एकूण २.७ लाख युनिट्सची विक्री झाली. त्याची अद्ययावत आवृत्ती मे २०१८ मध्ये रिलीज झाली, जी फेब्रुवारी २०२० पर्यंत विकली गेली. एकूण १.९ लाख युनिट्सची विक्री झाली.

यानंतर, मार्च २०२० मध्ये एक नवीन मॉडेल आले, जे डिसेंबर २०२३ पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध राहिले. त्याची एकूण विक्री ५.१ लाख युनिट्स होती. आणि, आता Creta चे सध्याचे मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे, जे जानेवारी २०२४ मध्ये लाँच केले गेले आहे. याला आतापर्यंत ६०,००० हून अधिक बुकिंग मिळाले आहेत.

अलीकडेच लाँच झालेल्या नवीन Hyundai CRETA ला देखील ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि घोषणेपासून आतापर्यंत ६०,००० हून अधिक बुकिंग मिळाले आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, क्रेटा लाइनअप तीन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.