कुटुंबासह कुठेही फिरता येत असल्याने एरव्ही लोक कारला मोठ्या प्रमाणात पसंती देत आहे. कदाचित हेच कारण आहे की काय या वर्षी सणासुदीच्या काळात विशेषत: नवारात्री आणि दिवाळीत मोठ्या प्रमाणात कारची विक्री झाली आहे. दिवाळीमध्ये मागणी बघता अनेक कंपन्यांनी आपल्या कार्सवर मोठी सूट देखील दिली होती. दरम्यान या काळात तुम्हाला कार घेणे शक्य झाले नसेल आणि आता तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर ह्युंडाईने तुमच्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध केली आहे.

ह्युंडाई कंपनी आपल्या काही वाहनांवर १ लाख रुपयांपर्यंतची सूट देत आहे. अहवालांनुसार, ऑफर या महिन्याच्या शेवटपर्यंतच आहे. ऑफर अंतर्गत ग्राहकाला कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंटचा लाभ घेता येईल. ह्युंडाई आपल्या कोणत्या कार्सवर सूट देत आहे, जाणून घेऊया.

१) कोना इलेक्ट्रिक

कोना हे ह्युंडाईचे भारतातील पहिले इलेक्ट्रिक वाहन आहे. ही कार २०१९ मध्ये भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आली होती. ऑफरनुसार, या वाहनावर तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट मिळेल. कॉर्पोरेट डिस्काउंट किंवा एक्सचेंज बेनेफिट मिळत नाही. पूर्ण चार्ज केल्यावर ही कार ४५२ किमीची रेंज देते. या वाहनाची किंमत २३.७९ लाखांपासून २३.९८ लाखांपर्यंत आहे.

२) ग्रँड आय १० निओ

या वाहनाच्या १.० लिटर टर्बो व्हेरिएंटवर ३५ हजार रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट मिळत आहे. सीएनजी व्हेरिएंटवर २५ हजार आणि १.२ लिटर पेट्रोल व्हेरिएंटवर १५ हजार रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. १० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ३ हजार रुपयांच्या कॉर्पोरेट बोनससह या कारवर ४८ हजार रुपयांची बचत करू शकता. या वाहनाची किंमत ५.१९ लाखांपासून ८.५२ लाखांपर्यंत आहे.

३) ऑरा

ऑराच्या पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिएंटवर अनुक्रमे ५ हजार आणि २५ हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट मिळत आहे. त्याचबरोबर, या कारवर तुम्हाला १० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ३ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळत आहे. या वाहनाची किंमत ५.९२ लाखांपासून ९.४३ लाखांपर्यंत आहे.

४) आय २०

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आय २० वाहनावर ग्राहकांना १० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि १० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे, ज्यामुळे एकूण २० हजार रुपयांचा डिस्काउंट आय २० कारवर मिळत आहे. मात्र या ऑफरमध्ये केवळ मॅग्ना आणि स्पोर्ट्झ व्हेरिएंटचा समावेश आहे. आय २० ६.८ लाखांपासून ११.४३ लाखांपर्यंत मिळते.