Kawasaki ही एक मोटारसायल उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल लाँच करत असते. तसेच लाँच केलेल्या मॉडेल्सवर सूट देत असते. जपानी मोटारसायकल उत्पादक कावासाकीने त्यांच्या Ninja 300 या मॉडेलसाठी मर्यादित कालावधीत ग्राहकांना सवलत जाहीर केली आहे.

कावासाकीच्या निंजा ३०० या मोटारसायकलवर मर्यादित कालावधीमध्ये १०,००० रुपयांची सूट कंपनी देत आहे. ही ऑफर ३१ जानेवारी २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे.

हेही वाचा : Honda Activa H Smart ‘की- लेस’ फीचर्ससह झाली लाँच; जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Ninja 300 चे फीचर्स

कावासकीच्या निंजा ३०० या मोटारसायकलमध्ये २९९ सीसी इनलाईन ट्विन-सिलेंडर लिक्विड-कूल्ड पद्धतीचे इंजिन येते. तसेच यामध्ये ६ स्पीडचा मॅन्युअल गिअरबॉक्स येतो. हाय स्पीडच्या वेळी व्हील लॉकिंग कमी करण्यासाठी मदत व्हावी म्हणून स्लीपर क्लच देखील या मोटारसायकलमध्ये येतो. तसेच ट्वीन हेडलाईट सेटअप, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, मागील बाजूस मोनोशॉक, दोन्ही टोकांना ABS, अलॉय व्हील्स आणि क्लिप-ऑन बारसह डिस्क ब्रेक्स येतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे किंमत ?

Kawasaki Ninja 300 ची सवलत असण्यापूर्वीची किंमत ही ३,४०,००० रुपये इतकी आहे. ही मोटारसायकल लाइम ग्रीन, कँडी लाइम ग्रीन आणि इबोनी या तीन रंगांमध्ये येते. हे तीनही रंग ऑफरसाठी पात्र असणार आहेत.