Best Selling Car- June 2023: जून २०२३ मध्ये, मारुती सुझुकी ही सर्वात जास्त कार विकणारी कंपनी ठरली आहे. एकूण कार विक्रीच्या बाबतीत ह्युंदाई दुसऱ्या क्रमांकावर आणि टाटा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी, मारुती सुझुकी वॅगनआर ही सर्वाधिक विक्री होणारी कार आहे, या कारनं टाटा नेक्सॉन आणि ह्युंदाई क्रेटासह सर्वांना मागे टाकले आहे. वॅगनआरची देशात जवळपास दोन दशकांपासून विक्री सुरू आहे. यादरम्यान, त्याच्या डिझाइनपासून ते वैशिष्ट्यांपर्यंत बरेच काही अपडेट केले गेले आहे. हे परवडणाऱ्या किमतीत चांगली कामगिरी आणि मायलेज देते. ही कार CNG वर ३४.०५km/kg पर्यंत मायलेज देते.

या कारला ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल गिअरबॉक्स तसेच दोन पेट्रोल इंजिन पर्याय आहेत. हे १.० लीटर पेट्रोल इंजिनसह येते जे कंपनी फिट सीएनजीच्या पर्यायामध्ये देखील दिले जाते. कार १.२ लीटर पेट्रोल इंजिनसह देखील उपलब्ध आहे.

(हे ही वाचा : Maruti Ertiga साठी बाजारपेठेत ‘ही’ सात सीटर कार बनतेय अडथळा, विक्री जोमात अन् बाकी सारे कोमात! )

६ कलर पर्यायांमध्ये उपलब्ध, मारुती वॅगनआर ३४१ लीटर बूट स्पेस आणि ७-इंचाचा डिस्प्ले, ४-स्पीकर म्युझिक सिस्टम, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, रिअर पार्किंग सेन्सर्स, EBD सह ABS आणि हिल होल्ड असिस्ट यांसारखी फिचर्स ऑफर करते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मारुती सुझुकी वॅगनआर LXi, VXi, ZXi आणि ZXi+ या ४ ट्रिममध्ये एकूण ११ प्रकारांमध्ये विकली जाते. या हॅचबॅकची एक्स-शोरूम किंमत ५.५५ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती ७.४३ लाख रुपयांपर्यंत जाते.