Rockstar Yash Car Collection: कन्नड सुपरस्टार यशने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. अभिनेता यशने ‘KGF Chapter 1’ या चित्रपटाच्या माध्यमाने प्रेक्षकांच्या मनामध्ये ठसा उमटविला आहे. आज त्याचा ३७ वा वाढदिवस तो साजरा करत आहे. अभिनेता यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा (Naveen Kumar Gowda) आहे. कारच्या बाबतीत यशची पसंती बऱ्यापैकी आहे. आज आपण त्याच्या कार कलेक्शनमध्ये कोणत्या कोणत्या गाड्यांचा समावेश आहे, जाणून घेऊया.

कन्नड़ फिल्म सुपरस्टार यश ‘या’ लग्झरी कारचा मालक

Audi Q7:  Q7 ही Audi मधील सर्वात प्रीमियम SUV आहे. ऑडी सेलिब्रिटींमध्ये फार लोकप्रिय आहे. ही ऑडी Q7 यशकडेही आहे. Q7 मध्ये पॉवरफुल फीचर्ससह जबरदस्त लूक आणि शक्तिशाली इंजिन आहे.

Karisma Kapoor saved Harish
सीनच्या शूटिंगदरम्यान पाण्यात बुडणाऱ्या अभिनेत्याचा करिश्मा कपूरने वाचवला होता जीव, ३३ वर्षांनी हरीशने केला खुलासा
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!

Mercedes Benz GLS 350D: यशच्या कार कलेक्शनमध्ये स्पोर्टी दिसणारी GLS 350D आहे. हे डिझेल इंजिनसह येते, जे २५५bhp पॉवर आणि ६२०Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. हे इंजिन ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते.

(हे ही वाचा : बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीकडे आहे लक्झरी कारचा मोठा संग्रह! किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क )

BMW 520D: यशकडे BMW 5-Series देखील आहे, जी त्याच्या संग्रहातील एकमेव सेडान आहे. BMW 5-Series ही अतिशय उपयुक्त कार आहे. यश ५-सिरीजची डिझेल कार चालवतो, जी ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते.

Mercedes GLC 250D Coupe: Coupe SUV भारतात खूप लोकप्रिय होत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या कार कलेक्शनमध्ये किमान एक कूप एसयूव्ही असते. यशकडे मर्सिडीज GLC 250D कूप आहे. कार २.०-लिटर डिझेल इंजिनसह येते जी १९२bhp आणि ३२०-४००Nm टॉर्क निर्माण करते.

Pajero Sport: यशलाही मोठ्या एसयूव्हीचे वेड आहे. त्यामुळे यश पजेरोचा मालक आहे. ही पजेरो २००८ मध्ये लाँच झाली होती. हे २.५-लिटर डिझेल इंजिनसह येते.