scorecardresearch

Kawasaki Versys 650 भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कावासाकीने आपल्या लोकप्रिय स्पोर्ट्स टूरर बाईक Versys 650 चे अपडेटेड व्हर्जन भारतात लॉंच केले आहे.

Kawasaki-Versys-650
(फोटो-KAWASAKI)

कावासाकीने आपल्या लोकप्रिय स्पोर्ट्स टूरर बाईक Versys 650 चे अपडेटेड व्हर्जन भारतात लॉंच केले आहे. कंपनीने या बाईकची सुरुवातीची किंमत ७.३६ लाख रुपये निश्चित केली आहे. कंपनीने या बाईकसाठी बुकिंग प्रक्रिया सुरू केली आहे, ज्यामध्ये ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा त्यांच्या जवळच्या डीलरशिपला भेट देऊन बुक करू शकतात. कंपनी लवकरच या बाईकची डिलिव्हरीही सुरू करणार आहे.

Kawasaki Versys 650 कंपनीने नवीन डिझाइन, नवीन ग्राफिक्स, कॉस्मेटिक अपडेट्स आणि काही इलेक्ट्रॉनिक अपडेट्ससह सादर केले आहे. डिझाईनबद्दल सांगायचे झाले तर, कंपनीने त्यात एक मोठे विंड शील्ड दिले आहे, जे हाय स्पीड दरम्यान वारा आणि इतर गोष्टींपासून रायडरचे संरक्षण करेल. बाईकची लायटिंग सिस्टम बदलत कंपनीने हॅलोजन बल्बऐवजी ट्विन एलईडी हेडलॅम्प दिले आहेत.

यासोबतच कंपनीने आपल्या बॉडी ग्राफिक्समध्ये पहिल्यापेक्षा नवीन फीचर्स, फोर स्टेप अ‍ॅडजस्टेबल विंडस्क्रीन, टू लेव्हल केटीआरसी म्हणजेच कावासाकी ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम आणि अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. कंपनीने नवीन Kawasaki Versys 650 दोन रंगांच्या थीमसह सादर केले आहे, ज्यामध्ये पहिला रंग कँडी लाइम ग्रीन आहे आणि दुसरा रंग मेटॅलिक फॅंटम सिल्व्हर देण्यात आला आहे.

आणखी वाचा : Royal Enfield Classic 350 Halcyon Series Finance Plan: ड्युअल ABS असलेली ही क्रूझर बाईक केवळ २२ हजारात

बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे तर, कंपनीने या मध्यम वजनाच्या स्पोर्ट्स टूरर बाईकमध्ये ६४९ cc पॅरलल-ट्विन ४ स्ट्रोक इंजिन दिले आहे जे लिक्विड कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे.
हे इंजिन ८,५०० rpm वर ६५ bhp ची पॉवर आणि ७००० rpm वर ६१ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, कंपनीने या बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह एक नवीन TFT डिस्प्ले दिला आहे, ज्यामध्ये तुम्ही कॉल, एसएमएस अलर्ट, नेव्हिगेशन यांसारख्या फीचर्सचा वापर करू शकाल.

आणखी वाचा : Top 3 Best Cheapest Bikes India: कमी किमतीत १०४ kmpl पर्यंतचे मायलेज देणाऱ्या या आहेत टॉप ३ बाईक

बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर कावासाकीने त्याच्या पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे, ज्यामध्ये ड्युअल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. बाजारात प्रवेश केल्यानंतर, ही Kawasaki Versys 650 मध्यम वजनाच्या स्पोर्ट्स टूरर बाइक विभागातील लोकप्रिय बाईक्स, Triumph Tiger Sport 660 आणि Suzuki V-Strom 650 XT यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kawasaki versys 650 launched in india know complete details from price to features and specification prp