SUV Car Pre-Booking Starts: २५ सेफ्टी फीचर्ससह नव्या अवतारात देशात दाखल झालेल्या कारचे कंपनीने बुकिंग सुरु करण्याची घोषणा केली आहे. सहा एअरबॅग्स देणारी पहिली गाडी ठरली आहे. तसंच, या कारमध्ये विषाणू आणि जीवणूंपासून सुरक्षेसाठी स्मार्टप्युअर एअर प्युरिफायरही देण्यात आले आहेत. भारतीय वाहन बाजारपेठेतील ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन कार निर्माता कंपनी कियाने आता त्यांच्या लोकप्रिय कारचं मॉडेल सादर केलं आहे. १०० देशांत ही कार निर्यात करण्यात येणार असून सर्वात आधी भारतीय बाजारपेठेत या कारचं लॉन्चिंग करण्यात आलं होतं.

भारतात रस्ते अपघाताचं प्रमाण अधिक आहे. चालकांच्या चुकीमुळे हे अपघात होतात. असे संभाव्य अपघात रोखता यावेत याकरता या कारमध्ये खास यंत्रणा देण्यात आली आहे. या नवीन कारमध्ये आठ सिंगल-टोन पर्यायांसह अनेक रंग पर्याय देण्यात आले आहेत. ऑलिव्ह, व्हाइट, सिल्व्हर, ग्रे, ब्लॅक , लाल, निळा आणि पांढरा. शिवाय, मॅट शेड केवळ X लाइन प्रकारासाठी उपलब्ध आहे. या कारमध्ये १०.२५ इंच मुख्य टचस्क्रीन डिस्प्ले आणि अतिरिक्त १०.२५ इंच LCD ड्रायव्हर डिस्प्ले युनिट आहे.

(हे ही वाचा : पाकिस्तानची उतरती कळा सुरु! आर्थिक संकटामुळे ३० दिवसात फक्त ‘इतक्या’ कारची विक्री; आकडा तर… )

Kia ने नवीन Kia Sonet facelift साठी बुकिंग सुरु करण्याची घोषणा केली आहे. आता या कारचं प्री-बुकिंग आज २० डिसेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून सुरू होणार आहे. Kia K-Code Kia India वेबसाइट (www.kia.com/in) आणि MyKia अ‍ॅपद्वारे बुकिंगसाठी वापरला जाऊ शकतो.  सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्यांना झटपट डिलिव्हरी हवी आहे त्यांच्यासाठी किआने ‘के-कोड’ प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. हा ‘के-कोड’ फक्त २० डिसेंबर २०२३ साठी वैध आहे. १४ डिसेंबर २०२३ रोजी त्याचे अनावरण करण्यात आले. मात्र, त्याची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. नवीन सोनेटची डिलिव्हरी जानेवारी २०२४ मध्ये सुरू होईल. तथापि, त्याच्या डिझेल एमटी प्रकाराची डिलिव्हरी फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होईल.

कंपनीने दावा केला आहे की, ही सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित कॉम्पॅक्ट एसयूव्हींपैकी एक आहे. यात ७०+ कनेक्टेड कार वैशिष्ट्ये देखील आहेत, ज्यात सराउंड व्ह्यू मॉनिटर (SVM), हिंग्लिश कमांड्स आणि व्हॅलेट मोडचा समावेश आहे. नवीन सोनेटला फक्त आउटगोइंग मॉडेलचे पॉवरट्रेन पर्याय मिळतात. पण, आता पुन्हा डिझेल व्हेरियंटसह मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.