महिंद्राची टॉप सेलिंग एसयूव्ही पैकी एक असलेली बोलेरो नियो लवकरच नव्या अवतारात सादर होणार आहे.  महिंद्रा बोलेरो निओ प्लसची टेस्टिंग पूर्ण झाली असून ते आता लाँच होण्यासाठी सज्ज आहे. तथापि, कार निर्मात्याने अधिकृत लाँच तारीख अद्याप घोषित केलेली नाही परंतु एसयूव्ही सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. नवीन महिंद्रा बोलेरो निओ प्लस सात प्रकारांमध्ये लाँच होऊ शकते. ज्यामध्ये अॅम्ब्युलन्स मॉडेल देखील समाविष्ट असेल.

यामध्ये, खरेदीदारांना ७-सीटर आणि ९-सीटर सीटिंग कॉन्फिगरेशनचा पर्याय असेल. बोलेरो निओच्या तुलनेत, निओ प्लसची लांबी जास्त असेल, ती ४,४०० मिमी लांब असू शकते. तथापि, विद्यमान २,६८० मिमी व्हीलबेस कायम ठेवला जाईल. SUV ची एकूण रुंदी आणि उंची अनुक्रमे १,७९५ mm आणि १,८१२ mm असू शकते.

(हे ही वाचा : MG ची इलेक्ट्रिक एसयूव्ही आता नव्या अवतारात; दमदार फीचर्सह मिळेल जबरदस्त रेंज, अन् किमतही कमी )

नवीन महिंद्रा बोलेरो निओ प्लसमध्ये २.२L डिझेल इंजिन दिले जाऊ शकते. हे तेच इंजिन असेल जे Scorpio-N ला देखील शक्ती देते परंतु ते पुन्हा ट्यून केले जाईल, जे सुमारे १२०bhp उत्पादन करण्यास सक्षम असेल. ट्रान्समिशनसाठी ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिला जाऊ शकतो. SUV ला 2WD सिस्टम मिळेल. महिंद्रा बोलेरो निओपेक्षा वेगळे करण्यासाठी किरकोळ कॉस्मेटिक बदल देखील केले जातील.

महिंद्रा बोलेरो निओ प्लस मधील बहुतेक फीचर्स तेच असतील, जे बोलेरो निओ मध्ये येतात. यामध्ये २-DIN ऑडिओ सिस्टम, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, व्हॉईस मेसेजिंग सिस्टम, ७.०-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, उंची-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, इलेक्ट्रिकवर चालणारे ORVM, ड्रायव्हर आणि सह-ड्रायव्हरसाठी आर्मरेस्ट, फॅब्रिक अपहोल्स्ट्री, ड्युअल एअरबॅग्ज, रियर पार्किंग सेन्सर्स यांचा समावेश आहे. EBD आणि क्रूझ कंट्रोल सारखी वैशिष्ट्ये ABS सह आढळू शकतात.

Mahindra Bolero Neo Plusची सुरुवातीची किंमत १० लाख रुपये असू शकते.

Story img Loader