देशातील कार सेक्टरमध्ये ऑफ-रोड एसयुव्ही सेगमेंट खूपच लहान आहे. ज्यामध्ये फक्त निवडक एसयुव्ही आहेत, परंतु ऑफ-रोड कारचे चाहते लोक मोठ्या संख्येने आहेत. या कार साहसी आणि लांब पल्ल्याच्या ट्रिपला जाणाऱ्या लोकांना तुलनेने जास्त आवडतात. पण जास्त किमतीमुळे एसयुव्ही लोकांना परवडत नाहीत. पण तुम्हाला महिंद्रा स्कॉर्पियो आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. १५ लाखांची स्कॉर्पियो अवघ्या ८ लाख रुपयांत मिळतीये. पाहा नेमकी ऑफर काय आहे ते.

जर तुम्ही शोरूममधून ही महिंद्रा स्कॉर्पिओ खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला १३.१८ लाख ते १८.१४ लाख रुपये  मोजावे लागतील. परंतु तुम्ही ही SUV फक्त रु. ८ लाखाच्या बजेटमध्ये वर सांगितलेल्या ऑफरद्वारे घरपोच नेऊ शकता, तेही आकर्षक लोन आणि गॅरंटी-वॉरंटीसह. या महिंद्रा स्कॉर्पिओवर आजची ऑफर सेकंड हँड कार खरेदी आणि विक्री करणार्‍या वेबसाइट CARS24 द्वारे दिली गेली आहे. त्यांनी ही कार आपल्या साइटवर पोस्ट केली आहे आणि किंमत फक्त ८,२२,३९९ रुपये ठेवली आहे.

वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या SUV चे मॉडेल २०१५ चे आहे आणि त्याचे वेरिएंट S6 Plus आहे. ही गाडी आतापर्यंत ६७,६२४ किमी धावलेली आहे. या महिंद्रा स्कॉर्पिओची ही पहिलीच मालकी आहे आणि तिची नोंदणी HR 51 RTO कार्यालय, हरियाणा येथे नोंदणीकृत आहे. कंपनी या एसयूव्हीच्या खरेदीवर काही अटींसह सहा महिन्यांची वॉरंटी तसेच सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी देत आहे.

या मनी बॅक गॅरंटी योजनेनुसार, जर तुम्ही ही महिंद्रा स्कॉर्पिओ खरेदी केली आणि त्यात काही दोष आढळला किंवा तुम्हाला तो आवडला नाही, तर तुम्ही ती कंपनीला परत करू शकता. ही SUV परत केल्यानंतर, कंपनी तुमचे संपूर्ण पेमेंट तुम्हाला कोणत्याही कपातीशिवाय परत करेल. जर तुमचे बजेट खूपच कमी असेल किंवा तुम्ही एकाच वेळी सर्व पैसे भरून ते खरेदी करू इच्छित नसाल तर कंपनी तुम्हाला लोन देखील देत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या लोन प्लॅननुसार, तुम्ही ही SUV झिरो डाउन पेमेंटसह घरी घेऊ शकता, त्यानंतर तुम्हाला पुढील ६० महिन्यांसाठी दरमहा १८,८५४ रुपयांचा चा मासिक EMI भरावा लागेल.