scorecardresearch

दक्षिण आफ्रिकेतल्या वाहन कंपन्यांचे धाबे दणाणले, ‘ही’ मेड इन इंडिया SUV बाजारात दाखल

महिंद्रा आणि महिंद्राच्या चाकण येथील प्लान्टमध्ये तयार करण्यात आलेली एसयूव्ही आता दक्षिण आफ्रिकेत विकली जाणार आहे.

Mahindra Scorpio N
महिंद्रा स्कॉर्पिओ एन ही कार दक्षिण आफ्रिकेत लाँच करण्यात आली आहे. (PC : Mahindra)

महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीची भारतात बनवलेली स्कॉर्पिओ एन ही एसयूव्ही दक्षिण आफ्रिकेतील बाजारात लाँच करण्यात आली आहे. न्यू जनरेशन महिंद्रा स्कॉर्पिओ एन ही कार तीन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आली आहे. यामध्ये झेड-४, झेड-८ आणि झेड-८एल या मॉडेल्सचा समावेश आहे. या कारची किंमत ४,६५,००० रँड (जवळपास २१.९५ लाख रुपये) ते ५,९०,००० रँड (जवळपास २७.८२ लाख रुपये इतकी आहे.

दक्षिण आफ्रिकेतील बाजारात आधीपासूनच जुनी स्कॉर्पिओ कार विकली जात आहे. त्यासोबत आता स्कॉर्पिओ एन ही कार देखील विकली जात आहे. दक्षिण आफ्रिकेत लाँच करण्यात आलेल्या स्कॉर्पिओ एन करमध्ये २.२ लीटर एमहॉक डिझेल इंजिन देण्यात आलं आहे, जे १७२ बीएचपी पॉवर आणि ४०० न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. यात ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे. यात 4X4 ड्राईव्हचा पर्याय मिळेल. कंपनीने द. आफ्रिकेत या कारचं ७ सीटर मॉडेल सादर केलं आहे.

कशी आहे स्कॉर्पिओ एन?

महिंद्रा स्कॉर्पिओ एन कारमधील फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास यात एलईडी डीआरएल आणि टेललाईट्स मिळतात. यात १८ इंचांचे डायमंड-कट अलॉय व्हील्स, इलेक्ट्रिक सनरूफ, डुअल झोन क्लायमेट कंट्रोल, लेदर सीट्स, १२ स्पीकर सोनी साऊंड सिस्टिम. ८ इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. जी अॅपल कारप्ले, अँड्रॉयड ऑटोला सपोर्ट करते. डिझेल इंजिन व्हेरिएंट्समध्ये झिप, झॅप आणि झूम असे ड्रायव्हिंग मोड्स मिळतात.

हे ही वाचा >> महिना बदलला, वर्ष बदललं तरी ‘या’ कारचा दबदबा कायम, ३१ दिवसात विकल्या १५,५६७ गाड्या

६ एअरबॅग्ससह मिळतील सेफ्टी फीचर्स

या एसयूव्हीमधील सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास या कारमध्ये ६ एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी, ईएससी आणि फोर डिस्क ब्रेक सिस्टिम देण्यात आली आहे. या कारला सुरक्षेच्या बाबतीत ग्लोबल एनसीएपीने ५ स्टार सेफ्टी रेटिंग दिलं आहे. ही कार महिंद्राच्या चाकण येथील प्लान्टमध्ये बनवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 19:54 IST
ताज्या बातम्या