Mahindra Car Fire Incident: देशभरात सातत्याने वाहनांना आग लागण्याच्या, त्यामधील बॅटरीचा स्फोट होण्याच्या घटना घडत आहेत. इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर्स, बाइक आणि इलेक्ट्रिक दुचाकी निर्मात्या कंपन्यांच्या डीलरशिप्समध्ये आग लागण्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र आता महिंद्राच्या लोकप्रिय एसयुव्हीला आग लागल्याची घटना समोर आली आहे.

‘या’ कारला लागली आग

Mahindra XUV 700 ही कंपनीची लोकप्रिय SUV आहे. यात प्रगत वैशिष्ट्यांसह उत्कृष्ट सुरक्षा देण्यात आली आहे. लाँच झाल्यापासून या एसयूव्हीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, अलीकडेच ही कार एका चुकीच्या कारणामुळे चर्चेत आली आहे. Mahindra XUV 700 ला आग लागल्याची घटना समोर आली आहे आणि सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेनंतर महिंद्राचे वक्तव्यही समोर आले आहे, चला तर जाणून घेऊया नेमकं काय घडलं…

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!

प्रकरण काय आहे?

ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला उभी असलेली एसयूव्ही पेटताना दिसत आहे. आग प्रथम वाहनाच्या इंजिनच्या डब्यात लागली आणि आगीत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले. हा व्हिडिओ कुलदीप सिंह नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर शेअर केला आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “महिंद्राचे आभार, त्यांच्या प्रीमियम कारमुळे माझ्या कुटुंबाचे जीव धोक्यात आले होते. जयपूर हायवेवर गाडी चालवत असताना कारला आग लागली. कार फारशी गरम नव्हती. नुकताच धुर चढला आणि मग आग लागली.”, असे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर कुलदीपची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

येथे पाहा व्हिडीओ

कंपनीने काय म्हटले?

महिंद्रा कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आम्ही जयपूर हायवेवर महिंद्रा XUV700 च्या घटनेबद्दल चिंतित आहोत. तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे जेणेकरून या घटनेमागील कारण समजू शकेल.