Flex Fuel Car: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून, त्यामुळे जनतेच्या खिशावर बोजा वाढत आहे. यासाठी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉल आणायच्या विचारात आहे. त्यामुळेच देशातील नामांकीत कार कंपनी मारुती सुझुकीनेही पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून फ्लेक्स इंधनावर (Flex Fuel Car) धावणारी ‘WagonR’ आणली आहे.

कंपनीने दाखवली WagonR ची झलक

कंपनीने आपल्या WagonR चे प्रोटोटाइप मॉडेलची झलक दिल्ली येथे आयोजित Society of Indian Automobile Manufacturers च्या कार्यक्रमात दाखवली आहे. कारला टक्के इथेनॉल असलेले पेट्रोल आणि 85 टक्के इथेनॉल असलेले पेट्रोल मधील इथेनॉल-पेट्रोल मिश्रणावर चालण्यासाठी डिझाइन केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या वॅगनआरचे अनावरण करण्यात आले.

Flex Fuel फ्लेक्स फ्यूल म्हणजे काय?

फ्लेक्स हा इंग्रजी शब्द flexible पासून बनला आहे. फ्लेक्स फ्यूलचा अर्थ पेट्रोल आणि इथेनॉलच्या मिश्रणावर काम करणारे इंधन. पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून फ्लेक्स-इंधनाकडे पाहिले जात आहे. याला पर्यायी इंधन असेही म्हणतात. हे पेट्रोल आणि इथेनॉलच्या मिश्रणापासून तयार केले जाते. फ्लेक्स इंधन इंजिन पूर्णपणे पेट्रोल किंवा इथेनॉलवर देखील चालू शकतात.

(हे ही वाचा : खुशखबर: ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा Mercedes-Benz; पाहा ऑफर्स )

फ्लेक्स इंधनाचे फायदे कोणते?

फ्लेक्स फ्युएलमध्ये मोठ्या प्रमाणात इंजिन बदलांची गरज भासत नाही. तसेच, इंधन खर्च कमी करताना ईव्हीपेक्षा ते स्वीकारणे सोपे आहे. तसेच उच्च इथेनॉल मिश्रित पेट्रोलची कमी किंमत, जी नियमित पेट्रोलपेक्षा किमान ३५ टक्के स्वस्त असणे अपेक्षित आहे. देशातील ४० टक्के प्रदूषणाचे कारण पेट्रोल आणि डिझेलसारखे इंधन आहे. त्यामुळे भविष्यात पर्यायी इंधन वापरणे काळाची गरज आहे.

भारतात कधी होणार लाँच?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मारुती सुझुकीने इंजिन व्यवस्थापन प्रणाली, इंधन पंप आणि इंधन इंजेक्टर तसेच या कारमधले इतर यांत्रिक घटक देखील अपग्रेड केले आहेत. कारमध्ये ई ८५ इंधनावर चालणाऱ्या इथेनॉल इंधनावर आधारित वॅगनआर फ्लेक्स फ्यूल प्रोटोटाईप वाहनासमान पॉवर मिळाली, यासाठी पारंपरिक गॅसोलिन वॅगनआर मॉडेलच्या तुलनेत टेलपाईप जीएचजी उत्सर्जन ७९ टक्के कमी करण्यास मदत करेल. ही फ्लेक्स इंधनावर धावणारी कार देशात २०२५ पर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कंपनीने मार्च २०२३ पर्यंत सर्व मॉडेल्स E२० इंधन अनुरूप बनवण्याची घोषणा केली आहे.