scorecardresearch

Alto आणि S-Presso खरेदी करणाऱ्यांना धक्का! स्वस्त वेरिएंट करण्यात आले बंद

कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून असे दिसून आले आहे की अल्टोचे STD, STD(O) आणि LXi ट्रिम बंद करण्यात आले आहेत.

maruti alto
(फोटो: Indian Express)

मारुती सुझुकीने परवडणारी हॅचबॅक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना धक्का दिला आहे. कंपनीने त्याच्या अल्टो आणि एस-प्रेसो मॉडेल्सचे सिंगल-एअरबॅग लोअर ट्रिम्स बंद केले आहेत. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून असे दिसून आले आहे की अल्टोचे STD, STD(O) आणि LXi ट्रिम बंद करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, S-Presso चे STD आणि LXi ट्रिम देखील बंद करण्यात आले आहेत. असे केल्याने, मारुती सुझुकी अल्टोचे नवीन बेस मॉडेल LXI (O) आणि एस-प्रेसोचे नवीन बेस मॉडेल STD (O) बनले आहे.

अल्टो आणि एस-प्रेसोची नवीन किंमत

हे प्रकार बंद केल्यानंतर आता दोन्ही वाहनांच्या सुरुवातीच्या किमतीतही बदल झाला आहे. मारुती सुझुकी अल्टो आता ४.०८ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) च्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे, तर मारुती सुझुकी एस-प्रेसो आता ३.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) च्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. अल्टोच्या टॉप मॉडेलची किंमत ५.०३ लाख रुपयांपर्यंत जाते, तर एस-प्रेसोची किंमत ५.६४ लाख रुपयांपर्यंत जाईल. दोन्ही कार फक्त पेट्रोल आणि पेट्रोल-सीएनजी पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.

एअरबॅग्जबाबत नव्या नियमाचे कारण?

या निर्णयानंतर आता ही दोन्ही वाहने बेस व्हेरियंटमधूनच ड्युअल एअरबॅगसह उपलब्ध होतील. मारुती सुझुकीने वर नमूद केलेले ट्रिम पर्याय बंद करण्यामागे कोणतेही कारण दिलेले नाही. तथापि, हे केंद्र सरकारने अनिवार्य केलेल्या सुरक्षा नियमांमुळे असू शकते, जे भारतातील सर्व कारला मानक म्हणून ड्युअल फ्रंट एअरबॅग्जसह फिट करणे अनिवार्य करते.

याशिवाय, काही महिन्यांपूर्वी, रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) एअरबॅगशी संबंधित नवीन मार्गदर्शक तत्त्वे प्रस्तावित केली आहेत. त्यात म्हटले आहे की, १ ऑक्टोबरनंतर नवीन वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. अल्टो आणि एस-प्रेसो व्यतिरिक्त, मारुती सुझुकी सेलेरियो आणि वॅगनआर मानकांप्रमाणे समान एअरबॅगसह विकते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maruti discontinues single airbag variants of alto and s presso ttg

ताज्या बातम्या