मारुती कंपनीला देशातील सर्वात मोठी कार कंपनी आहे असं म्हटलं जातं. लोकांनी सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात मारुतीच्या कार खरेदी केल्या आहेत. लोकांची मारुतीच्या छोट्या वाहनांपेक्षा युटिलिटी सेगमेंटला अधिक पसंती आहे. भारतातही गेल्या काही वर्षांमध्ये सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा दर्जेदार कार्स तयार करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे आणि अशा कारचीही विक्री मोठ्या प्रमाणार देशात होत आहे.

मारुतीच्या एका ८ लाखाच्या कारची विक्री बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात होत आहे. २०१६ ला बाजारात दाखल झाल्यापासून ही कार अनेक कारणांनी प्रकाशझोतात आली, अनेकांची तिला पसंतीही मिळाली. मागील वर्षी तिला नव्या रुपात सादर करण्यात आलं. कारमध्ये सनरुफ, ३६० डिग्री कॅमेरा असे फिचर्स देण्यात आले. ज्यामुळं पुन्हा एकदा या कारला घेण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. मारुतीच्या या कारनं विक्रीच्या बाबतीत टाटा नेक्सॉनला मागे टाकला आहे. 

Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
vasai chicken mutton shops marathi news
वसईत मांसाहार बंदीच्या निर्णयाच्या फज्जा, बंदी झुगारून चिकन-मटण विक्रीची दुकाने सुरू
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”

आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने ब्रेझाच्या विक्रीत झेंडा रोवला आहे. कंपनीने मार्च २०१६ मध्ये ही SUV लाँच केली आणि नोव्हेंबर २०२३ पर्यंत तिने १० लाख युनिट्सच्या विक्रीचा टप्पा गाठला. मारुती ब्रेझाने नोव्हेंबर २०२३ पर्यंत ९ लाख ९६ हजार ६०८ युनिट्सची विक्री केली आहे, जी १० लाख युनिट्सच्या विक्रीपेक्षा फक्त ३,३९२ युनिट्स कमी आहे. हा आकडा डिसेंबर २०२३ ला पूर्ण होईल, असा विश्वास कंपनीला आहे.

(हे ही वाचा: देशातील BMW च्या ‘या’ सर्वात स्वस्त बाईकसमोर Royal Enfield विसरुन जाल; स्पीड पाहून थक्क व्हाल, किंमत…)

मारुती ब्रेझाची भारतीय बाजारपेठेत टाटा नेक्सॉनशी थेट स्पर्धा आहे. मार्च २०१६ मध्ये जेव्हा ही कार लाँच झाली तेव्हा विक्रीच्या बाबतीत ती Nexon च्या मागे पडू लागली. परिस्थिती अशी होती की २०२२ आणि २०२३ या आर्थिक वर्षांमध्ये टाटा नेक्सॉन या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार बनली. यानंतर मारुतीने Brezza चे CNG मॉडेल लाँच केले ज्यामुळे विक्री वाढण्यास मदत झाली. अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या आठ महिन्यांत, मारुतीने ब्रेझाच्या १.१० लाखांपेक्षा जास्त युनिट्सची विक्री केली, जी नेक्सॉनच्या विक्रीपेक्षा ५९३ युनिट्स जास्त होती.

Maruti Brezza च्या सबकॉम्पॅट एसयुव्हीची किंमत ८.२९ लाख रुपयांपासून १४.०४ लाख रुपये इतकी आहे. LXi, VXi, ZXi आणि ZXi+ या चार ट्रीम्समध्ये ही उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे, या कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी इंजिन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. कारचे CNG इंजिन २५.५१ kmpl पर्यंत मायलेज देते. या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन ट्रान्समिशन आहेत. कारला अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.