Maruti Suzuki Cars Price Hike: मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ने ग्राहकांवर महागाईचा बॉम्ब फोडला आहे. कंपनीने आपल्या सहा मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. या सहा कारमध्ये स्विफ्ट, सेलेरियो आणि वॅगनआर सारख्या लोकप्रिय हॅचबॅक तसेच डिझायर, सियाझ आणि XL6 सारख्या इतर मॉडेल्सचा समावेश आहे. कंपनीने या महिन्यापासून या कारच्या किमतीत १५,००० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. नवीन दर एप्रिलपासून लागू झाले आहेत. दरवाढीनंतर हे सहा मॉडेल खरेदी करणे महाग झाले आहे. चला तर पाहूया कोणत्या कारच्या किमती किती वाढल्या…

‘ही’ कार झाली सर्वात महाग

कंपनीच्या XL6 MPV च्या किमतीत सर्वात मोठी वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी लाँच केलेला नवीन Xl6 आता १५,००० रुपयांनी महाग झाला आहे. किंमतवाढीनंतर, XL6 ची प्रारंभिक किंमत ११.४१ लाख (एक्स-शोरूम) वर गेली आहे.

भारतातील मारुतीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मॉडेलपैकी एक असलेल्या WagonR ची सर्वात कमी किमतीत वाढ झाली आहे. या हॅचबॅकच्या किमतीत १,५०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

आता त्याच्या बेस व्हेरियंटची किंमत ५.५४ लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाईल आणि टॉप व्हेरियंटची किंमत ७.४० लाख (एक्स-शोरूम) असेल.

(हे ही वाचा : Creta-Brezza चे वर्चस्व संपणार? TATA मार्केटमध्ये करणार धमाका, आणतोय ‘ही’ नवी Facelift SUV )

मारुती सेलेरियो आणि स्विफ्ट किंमत

मारुती सुझुकी सेलेरिओच्या किंमतीतही अशीच वाढ झाली आहे. त्याची किंमत १,५०० रुपयांनी वाढली आहे, त्यानंतर Celerio हॅचबॅक बेस LXi व्हेरियंटची किंमत ५.३६ लाख (एक्स-शोरूम) वर गेली आहे आणि टॉप व्हेरियंटची किंमत ७.१४ लाख (एक्स-शोरूम) असेल.

त्याचप्रमाणे मारुतीने स्विफ्टच्या किमतीत ५,००० पर्यंत वाढ केली आहे. हे कंपनीच्या सर्वोत्तम विक्री मॉडेलपैकी एक आहे. स्विफ्टची किंमत आता ५.९९ लाख (एक्स-शोरूम) ते ८.९७ लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

Maruti Ciaz  किंमत

Maruti Ciaz कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये होंडा सिटी, ह्युंदाई वेर्ना सारख्या इतर कारशी स्पर्धा करते. त्याची किंमत ११,000 रुपयांनी वाढली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचप्रमाणे, भारतातील सर्वाधिक विक्री होणारी सेडान, मारुती डिझायरची किंमत ७,५०० पर्यंत वाढली आहे. आता या सब-कॉम्पॅक्ट सेडानची किंमत ६.५१ लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.