मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबाबरोबर फिरायला जाण्यासाठी स्वतःची हक्काची कार हवी अशी प्रत्येकाच्या मनात इच्छा असते. सध्या फॅमिली कार म्हणा किंवा स्पोर्ट्स कार, तरुण मंडळींपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आकर्षित करतात. जर तुम्हीदेखील हटके कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वर्षाच्या अखेरीस मारुती सुझुकी इंडिया कंपनी ग्राहकांसाठी एका खास गाडीवर सूट देत आहे.

मारुती सुझुकी इंडिया वर्षाच्या शेवटी ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. ग्राहकांसाठी मारुती सुझुकीने ऑफ-रोडर ‘जिमनी’वर खास ऑफर ठेवली आहे.. जिमनी भारतात जूनमध्ये लाँच करण्यात आली होती. तेव्हापासून देशांतर्गत बाजारात केवळ १५,४७४ युनिट्सची विक्री करण्यात आली आहे. मारुती सुझुकी इंडियाने जूनमध्ये वाहनाच्या ३,०७१ युनिट्स, जुलैमध्ये ३,७७८ युनिट्स, ऑगस्टमध्ये ३,१०४ युनिट्स, सप्टेंबरमध्ये २,६५१ युनिट्स, ऑक्टोबरमध्ये १,८५२ युनिट्स; तर नोव्हेंबरमध्ये १,०२० युनिट्सची विक्री केली आहे. एक मजबूत आणि सक्षम ऑफ-रोडर म्हणून मारुती सुझुकी जिमनीची ओळख असूनही, खरेदीदारांनी गाडीच्या किमतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

मारुती सुझुकी इंडियाची ‘जिमनी’ दोन प्रकारात उपलब्ध आहे, ते म्हणजे झेटा (Zeta) आणि अल्फा (Alpha). तर खालीलप्रमाणे त्यांच्या एक्स-शोरूमच्या किमती आहेत.

झेटा एमटी – १२.७४ लाख रुपये
झेटा एटी – १३.९४ लाख रुपये
अल्फा एमटी – १३.६९ लाख रुपये
अल्फा एटी – १४.८९ लाख रुपये
अल्फा एमटी (ड्युअल टोन) – १३.८५ लाख रुपये
अल्फा एटी (ड्युअल टोन) – १५.०५ लाख रुपये

हेही वाचा…Ertiga ची उडाली झोप, ‘ही’ सात सीटर कार घेण्यासाठी मोठी गर्दी; प्रचंड मागणी पाहून कंपनीला बंद करावं लागलं बुकिंग

ग्राहकांनी जिमनीच्या किमतीबद्दल चिंता व्यक्त करताच मारुती सुझुकी इंडियाने आता जिमनीवर मोठ्या प्रमाणात सूट देण्याचा विचार केला आहे. ‘जिमनी’च्या झेटा (Zeta) व्हेरियंट एमटी (MT) आणि एटीमध्ये (AT) २.२१ लाख रुपयांपर्यंत (२.१६ लाख ग्राहक ऑफर आणि ५,००० रुपये कॉर्पोरेट बोनस) सूट आहे, तर अल्फावर (Alfa) ग्राहक १.२१ लाख रुपयांपर्यंत (१.१६ लाख ग्राहक ऑफर आणि ५,००० रुपये कॉर्पोरेट बोनस) सूट देत आहे. तसेच कार निर्मात्याने जिमनीचे स्पेशल ‘थंडर एडिशन’ही सादर केले आहे; ज्याची किंमत स्टँडर्ड मॉडेलपेक्षा झेटा व्हेरियंटसाठी दोन लाख रुपये, तर अल्फा व्हेरियंटसाठी एक लाख रुपयाने कमी आहे. ‘जिमनी’ के१५बी ( K15B) १.५ लिटर पेट्रोल इंजिन वापरते, जे १०५ पीएस (105PS) कमाल पॉवर आणि १३४ एनएम (134Nm) पीक टॉर्क देते.