Maruti Suzuki e Vitara : मारुती सुझुकी ई विटारा ही मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही कार असणार आहे जी लवकरच भारतात लाँच होण्याच्या तयारीत आहे. एसयूव्ही मारुतीच्या नेक्सा डीलरशिपद्वारे विकली जाईल. या इ इलेक्ट्रिक कार ई – विटारा एसयूव्ही कारची सर्वांना प्रतिक्षा आहे. कंपनी सर्वात आधी यूके आणि नीदरलँड सारख्या देशांमध्ये ई- विटाराची विक्री करणार.
या मॉडेलवर १० वर्षांची वॉरंटी
कंपनी या मॉडेलवर १० वर्षांची वॉरंटी देत आहे. विशेष म्हणजे सुझुकी यूरोपीय बाजारांमध्ये आपल्या कारांवर तीन वर्षांची म्हणजेच १,००,००० किमी किंवा सहा वर्षांची म्हणजे १५०,००० किमी ची वॉरंटी देत आहे. ई विटारा साठी कंपनीने आपल्या या वॉरंटी पॉलिसीला बदलले आहे. यामुळे हे स्पष्ट होते की ई-विटाराच्या बॅटरीवर १० वर्षांची वॉरंटी मिळू शकते.
१० वर्षांच्या या वॉरंटीवरून तुम्हाला कळेल की सुझुकी या कारची डिझाइनवर किती विश्वसाहर्ता आणि स्थायित्ववर किती विश्वास ठेवत आहे. आतापर्यंत कंपनीने अधिकतर मायलेज विषयी अद्याप माहिती दिलेली नाही पण यावर २,००,००० किमी ची वॉरंटी मिळू शकते.
मारुती सुझुकी ई-विटाराची किंमत
मारुती सुझुकी ई-विटाराची अपेक्षित किंमतीचा विचार केला तर सिग्मा (49kWh) च्या एक्स-शोरूम किमत जवळपास १८ लाख रुपये असू शकते. डेल्टा (49kWh) ची किंमत जवळपास १९.५० लाख रुपये असू शकते. जेटा (49kWh) ची किंमत जवळपास २१ लाख रुपये असेल. जेटा (61kWh) च्या एक्स-शोरूमची किंमत जवळपास २२.५० लाख रुपये असेल. अल्फा (61kWh) ची एक्स-शोरूम किंमत जवळपास २४ लाख रुपए असणार. फक्त जेटाला दोन्ही बॅटकी पॅक ऑप्शन मध्ये खरेदी करू शकणार.
मारुती सुझुकी ई-विटाराचे कलर ऑप्शन
मारुती सुझुकी ई-विटारा 10 एक्सटीरिअर कलर ऑप्शनसह लाँच होणार आहे. यामध्ये ६ मोनो-टोन आणि ४ डुअल-टोन कलरचा समावेश असणार. सिंगल-टोन कलर ऑप्शनसह नेक्सा ब्लू, स्प्लेंडिड सिल्वर, आर्कटिक व्हाइट, ग्रँड्योर ग्रे, ब्लूइश ब्लैक आणि ऑपुलेंट रेड असणार. तसेच डुअल-टोन कलर मध्ये ब्लॅक रूफ आणि ए-पिलर तसेच बी-पिलर उपलब्ध असणार. कंट्रास्टिंग आर्कटिक व्हाइट, लँड ब्रीज ग्रीन, स्प्लेंडिड सिल्वर आणि ऑपुलेंट रेड कलर ऑप्शनचा समावेश असणार.
मारुती सुझुकी ई-विटाराचे फीचर्स
मारुती सुझुकी ई-विटाराचे फीचर्समध्ये LED हेडलाइट्स, डेटाइम रनिंग लँप आणि टेल-लाइट्स, १८-इंचीचे व्हील, ग्रिलवर अॅक्टिव एअर वेंट, पॅनोरमिक सनरूफ, मल्टी-कलर इंटीरिअर एम्बिअंट लायटिंग, वायरलेस चार्जर, 10.25-इंचीचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, 10.1-इंचीचा इंफोटेनमेंट टचस्क्रीन, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, इनफिनिटी बाय हरमन ऑडियो सिस्टम, इन-कार कनेक्टिविटी टेक्नॉलॉजी, सिंगल-जोन ऑटो क्लायमेट कंट्रोल, पीएम 2.5 एअर फिल्टर, वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, 10-वे पावर एडजस्टेबल ड्रायव्हर सीट, रिक्लाइनिंग, स्लाइडिंग आणि स्प्लिट (60:40) रिअर सीट्स, ड्राइव्ह मोड (ईको, नॉर्मल, स्पोर्ट), स्नो मोड, वन-पॅडल ड्रायव्हिंग आणि रीजन मोडचा समावेश असणार.
मारुती सुझुकी ई-विटारा सेफ्टी किट
मारुती सुझुकी ई-विटारा सेफ्टी फीचर्समध्ये फक्त लेव्हल 2 ADAS सूट ज्यामध्ये लेन कीप असिस्ट, अडेप्टिव क्रूज कंट्रोलसारखे अन्य फीचर्सचा समावेश आहे. यामध्ये ७ एअरबॅग, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, टायर प्रेशर मॉनिटर, 360-डिग्री कॅमेरा, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर, रिअर डिस्क ब्रेक, ऑटो-होल्ड फंक्शन सह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, एग्जॉस्ट वेहिकल अलार्म सिस्टम (AVAS)इत्यादी फीचर्सचा समावेश आहे.