मारुती सुझुकीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन इंजिन संरक्षण योजना आणली आहे. या योजनेंतर्गंत ग्राहकांच्या गाड्यांना अतिशय कमी किमतीत इंजिन संरक्षण दिले जाईल. भेसळयुक्त इंधनामुळे इंजिन बंद पडण्याची परिस्थिती लक्षात घेऊन ही योजना आणली आहे. मारुती सुझुकीने हे ग्राहक सुविधा पॅकेज म्हणजेच CCP विक्रीनंतर मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. इंजिनमध्ये पाणी किंवा भेसळयुक्त इंधनामुळे होणारे नुकसान या योजनेमध्ये कव्हर केले जाईल. ज्या ग्राहकांना त्यांच्या कारसाठी ही योजना खरेदी करायची आहे, ते कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा त्यांच्या जवळच्या डीलरशिपला भेट देऊन ही योजना मिळवू शकतात.

मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक पार्थो बॅनर्जी म्हणाले की, “रस्त्यावर पाणी साचल्याने आणि भेसळयुक्त इंधनामुळे वारंवार इंजिन बंद पडणे किंवा बिघाड होण्याच्या घटनांमध्ये अलीकडच्या काळात वाढ झाली आहे. हे लक्षात घेऊन कंपनीने ही योजना सुरू केली आहे आणि आता अशा परिस्थितीचा सामना करताना ग्राहकांना घाबरण्याची गरज नाही. कारण तुमच्या वाहनाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला तर कंपनी त्याची काळजी घेईल. या पॅकेजचा लाभ घेण्यासाठी नाममात्र रक्कम भरावी लागेल. ग्राहकांना मारुती अल्टो आणि मारुती वॅगनआरसाठी सर्वात कमी म्हणजेच ५०० रुपये भरावे लागतील.”

tbo tek sets price band at rs 875 to 920 per share
टीबीओ टेकची प्रत्येकी ८७५ ते ९२० रुपयांना भागविक्री
Road cement concreting, Bhushan Gagrani,
पावसाळ्यादरम्यान रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे टाळावीत, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश
With restrictions on the export of non basmati rice the demand from the domestic market also declined Pune news
आंबेमोहर, कोलमचे दर घसरले; जाणून घ्या, ग्राहकांना काय फायदा होणार ?
virar, violation of safety norms, global city, sewage treatment plants
विरार : खासगी सांडपाणी प्रकल्पांकडून सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन

या योजनेअंतर्गत हायड्रोस्टॅटिक लॉकमुळे किंवा भेसळयुक्त इंधनामुळे इंजिन दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला कार तुमच्या जवळच्या मारुती सर्व्हिस स्टेशनवर कार घेऊन जावी लागेल. त्यानंतर कंपनी कोणतीही चौकशी न करता कार दुरुस्त करेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, मारुती सुझुकीच्या या इंजिन संरक्षण पॅकेजचा लाभ देशभरात पसरलेल्या कंपनीच्या अधिकृत वर्कशॉपना भेट देऊनघेता येईल. मारुती सुझुकीचे देशभरातील २१०० हून अधिक शहरांमध्ये ४२०० हून अधिक सर्व्हिस टच पॉइंट आहेत.