2023 Maruti Suzuki Ciaz: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने त्यांची प्रसिद्ध मध्यम आकाराची सेडान कार ‘2023 Maruti Suzuki Ciaz’ देशांतर्गत बाजारात नवीन ड्युअल-टोन अवतारात सादर केली आहे. कंपनीने या कारला नवा लूक तर दिला आहेच पण या सेडानलाही पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवले आहे. आकर्षक लुक आणि मजबूत सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज, ही सेडान कार एकूण दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन Maruti Suzuki Ciaz आता तीन नवीन ड्युअल टोन पेंट स्कीम तसेच एकूण सात मोनो टोन कलर पर्यायांमध्ये देखील उपलब्ध आहे. कार ब्लॅक रूफसह पर्ल मेटॅलिक ऑप्युलंट रेड, ब्लॅक रूफसह पर्ल मेटॅलिक ग्रॅंड्यूअर ग्रे आणि ब्लॅक रूफसह डिग्निटी ब्राउन अशा ड्युअल टोन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन अशा दोन्ही पर्यायांसह ही कार बाजारात दाखल करण्यात आली आहे. नवीन रंगांव्यतिरिक्त, कंपनीने या सेडान कारमध्ये काही विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये देखील समाविष्ट केली आहेत, ज्यामुळे ही कार प्रवाशांना अधिक सुरक्षितता प्रदान करते.

(हे ही वाचा : महिंद्राची गाडी चालवतायं? मग आजपासून करा ‘Free Servicing’, काय आहे खास ऑफर? जाणून घ्या )

मिळतील ‘हे’ खास सेफ्टी फीचर्स

मारुती सुझुकीने या सेडान कारमध्ये २० हून अधिक सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. यात आता मानक म्हणून हिल-होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्थिरता कार्यक्रम (ESP) समाविष्ट आहे, जे सर्व प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय ड्युअल एअरबॅग्ज, रियर पार्किंग सेन्सर्स, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) विथ इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) इत्यादी देण्यात आले आहेत. कंपनीचा दावा आहे की ही कार आता प्रवाशांना पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षितता प्रदान करते.

पॉवर, परफॉर्मन्स आणि मायलेज

कंपनीने Maruti Suzuki Ciaz च्या इंजिन मेकॅनिझममध्ये कोणताही बदल केलेला नाही. ही कार पूर्वीप्रमाणेच १.५ लीटर पेट्रोल इंजिनसह येते, जी १०३bhp पॉवर आणि १३८Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ४-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. कंपनीचा दावा आहे की त्याची मॅन्युअल आवृत्ती २०.६५kmpl पर्यंत आणि स्वयंचलित आवृत्ती २०.०४ kmpl पर्यंत मायलेज देते.

Maruti Suzuki Ciaz किंमत

Maruti Suzuki Ciaz ची सुरुवातीची किंमत ११.१४ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki india limited has launched the new and updated iteration of its flagship sedan the 2023 ciaz pdb
First published on: 16-02-2023 at 12:08 IST