देशांतर्गत कार उत्पादक फोर्स मोटर्स (Force Motors) च्या कार भारतीय बाजारात खूप पसंत केल्या जातात. त्यामुळे कंपनीही आपल्या नवनव्या कार्स देशात दाखल करत असते. किंवा जुन्या कारला अपडेट करुन नव्या रुपात लाँच करत असते. कंपनीने काही काळापूर्वी भारतातील पहिली १० सीटर पॅसेंजर कार लाँच केली होती. याला ‘Force Citiline’ असे नाव देण्यात आले. ही कार भारतीय बाजारात ग्राहकांच्या खूप पसंतीस उतरली. आता कंपनीने पुन्हा एकदा देशातील बाजारपेठेत मोठा धमाका केला आहे. कंपनीने आपली लोकप्रिय एसयूव्ही नव्या अवतारात दाखल केली आहे.

फोर्स मोटर्सने अखेर आपली Force Gurkha 5-Door एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. यासोबतच कंपनीने Gurkha 3-Door व्हेरिएंटही अपडेटसह लाँच केले आहे. Force Gurkha 5-Door आणि 3-Door व्हेरियंटची रचना समान आहे, जरी दोन्हीच्या आकारात आणि व्हीलबेसमध्ये फरक आहे. याशिवाय, दोन्ही एसयूव्हीमध्ये अद्ययावत वैशिष्ट्यांसह समान इंजिन वापरण्यात आले आहे.

(हे ही वाचा : ३९ हजार रुपये किंमत, १ लिटर पेट्रोलमध्ये धावते ११० किमी; ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त बाईक, पाहा यादी)

Force Gurkha 5-Door

Force Gurkha 5-Door बद्दल बोलायचे तर ते 3-Door व्हेरियंट प्रमाणे बॉक्सी डिझाइनमध्ये सादर केले गेले आहे. पूर्वीप्रमाणे, यात एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल आणि ग्रिलवर गुरखा बॅजिंग आहे. त्याच्या डॅशबोर्डमध्ये मोठी ९-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे ज्यासह Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध आहे. स्पेअर व्हील एसयूव्हीच्या बूट दरवाजाला जोडलेले आहे. ५-डोर व्हेरियंटमध्ये १८-इंच मशीन कट अलॉय व्हील्स बसवण्यात आले आहेत. छतावर टायर बसवण्याचाही पर्याय आहे. 5-Door प्रकारात, सीट तीन ओळींमध्ये प्रदान केल्या आहेत ज्यामध्ये मधली आसने बेंच डिझाइनमध्ये आहेत तर शेवटच्या ओळीत दोन कॅप्टन सीट प्रदान केल्या आहेत. Force Gurkha 5-Door व्हेरिएंटमध्ये सात लोकांच्या बसण्याची व्यवस्था आहे.

Force Gurkha 3-Door

आता कंपनी Force Gurkha 3-Door व्हेरियंटमध्ये १८-इंच अलॉय व्हील देखील देत आहे. डॅशबोर्ड लेआउट देखील अद्यतनित केले गेले आहे. या व्हेरियंटमध्ये कंपनीने फक्त समोरील बाजूस पॉवर विंडोचा पर्याय दिला आहे. 3-Door व्हेरियंटमध्ये देखील, कंपनीने एक मोठी ९-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम प्रदान केली आहे जी Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह येते. दोन्ही प्रकारांमध्ये कंपनीने मॅन्युअल एसी फंक्शन आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले प्रदान केले आहेत.

(हे ही वाचा : मारुतीच्या ‘या’ स्वस्त ७ सीटर कारला देशात मोठी मागणी; ६० हजाराहून अधिक लोक रांगेतच, मायलेज २६ किमी )

फोर्स मोटर्सने Gurkha मध्ये प्रवाशांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली आहे. ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, सीट बेल्ट अलार्म, सीट बेल्ट प्री-टेन्शनर या दोन्ही प्रकारांमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

फोर्सने Gurkha च्या दोन्ही प्रकारांमध्ये मर्सिडीजकडून मिळवलेले २.६ लिटर डिझेल इंजिन वापरले आहे. हे इंजिन १४० bhp ची कमाल पॉवर आणि ३२० Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. इंजिन ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. ४X४ ड्राइव्हट्रेनचा पर्याय दोन्ही मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने २५,००० रुपयांपासून त्याची बुकिंग सुरू केली आहे. Force Gurkha 5-Door व्हेरियंटची किंमत १८ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे, तर नवीन Force Gurkha 3-Door मॉडेलची एक्स-शोरूम किंमत १६.७५ लाख रुपये आहे.