Maruti Suzuki Jimny SUV Crosses 30000 Bookings: मारुती सुझुकीची मोस्ट अवेटेड एसयूव्ही जिमनी (मारुती सुझुकी जिमनी 5-डोर एसयूव्ही) ची आता लाँच तारीख जवळ आली आहे. अलीकडील मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारुती सुझुकी जिमनी 5 डोअर SUV च्या किमती ७ जून २०२३ रोजी जाहीर होतील. त्याचे बुकिंग १२ जानेवारीपासून सुरू झाले. कंपनीला अधिकृत लाँच होण्यापूर्वीच SUV साठी ३०,००० हून अधिक ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत.

Maruti Suzuki Jimny 5-door SUV: बुकिंग आणि डिलिव्हरी

नवीन Maruti Suzuki Jimny 5-door SUV ची पहिली झलक जानेवारी २०२३ मध्ये आयोजित ऑटो एक्सपो कार्यक्रमात दाखवण्यात आली होती. १२ जानेवारीपासून एसयूव्हीचे बुकिंग सुरू झाले आहे. सुमारे ५ महिन्यांत, मारुती सुझुकीला तिच्या आगामी जिमनी SUV साठी ३०,००० हून अधिक ऑर्डर मिळाल्या आहेत. या कारच्या किमती पुढील महिन्यात जाहीर केल्या जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे. लेटेस्ट जिमनी 5 डोअर एसयूव्हीची डिलिव्हरी लाँच झाल्यानंतर लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : देशातील ‘या’ स्वस्त तीन इंजिन पर्यायसह येणाऱ्या ७ सीटर MPV कारसमोर सर्व पडतात फेल? खरेदीसाठी ग्राहक रांगेत, किंमत… )

Maruti Suzuki Jimny 5-door SUV: इंजिन आणि मायलेज

मारुती सुझुकी जिमनी SUV ला १.५-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळेल. हे इंजिन १०३ bhp पॉवर आणि १३४ Nm टॉर्क निर्माण करते. ट्रान्समिशनसाठी, इंजिनसह ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ४-स्पीड टॉर्क-कन्व्हर्टर एटी निवडण्याचा पर्याय आहे. यात उत्कृष्ट ऑफ-रोड क्षमतेसाठी AllGrip Pro 4X4 सिस्टीम मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Maruti Suzuki Jimny 5-door SUV: किंमत आणि स्पर्धा

नवीन मारुती सुझुकी जिमनीच्या किमती पुढील महिन्यात म्हणजे जून २०२३ मध्ये जाहीर केल्या जाऊ शकतात. हे Zeta आणि Alpha या दोन प्रकारांमध्ये सादर केले जाईल. मारुतीच्या या मोस्ट अवेटेड एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत ९.९९ लाख ते १३.९९ लाख रुपये असण्याची अपेक्षा आहे. मारुती जिमनी 5-डोर एसयूव्ही बाजारात उपलब्ध असलेल्या महिंद्रा थार आणि फोर्स गुरखा सारख्या वाहनांना टक्कर देईल.