scorecardresearch

धमाकेदार ऑफर! मारुतीच्या Alto K10, Swift, Dzire पासून ‘या’ डॅशिंग कार मिळताहेत ‘इतक्या’ स्वस्त

Maruti Suzuki March Discount: या महिन्यात तुम्ही देखील नवी कार घेण्याचा विचार करत असाल तर मारुती सुझुकी आपल्या कारवर जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे.

Maruti Suzuki Car Discount
मारुती सुझुकीच्या 'या' कार स्वस्तात खरेदीची संधी (Photo-financial express)

Maruti Suzuki March Discount: Maruti Suzuki संपूर्ण मार्च महिन्यासाठी आपल्या निवडक कारवर ६१ हजार रुपयांपर्यंतची सूट देत आहे. या ऑफर अंतर्गत Alto K10, Alto 800, Celerio, S Presso, Wagon R, Dzire आणि Swift सारखे मॉडेल समाविष्ट आहेत. ही ऑफर या कारवर एक्स्चेंज बोनस, रोख सवलत आणि कॉर्पोरेट बेनिफिट्सच्या स्वरूपात दिली जात आहे, ही ऑफर CNG मॉडेल्सवरही लागू आहे.

‘या’ कारवर मिळतेय सूट

१. Maruti Suzuki Wagon R

मारुतीच्या सवलतीच्या ऑफर अंतर्गत, कंपनी तिच्या Wagon R च्या एंट्री-लेव्हल LXi आणि मिड-स्पेक VXi पेट्रोलच्या मॅन्युअल व्हेरियंटवर एकूण ६१,०० रुपयांपर्यंत सूट देत आहे. ज्यामध्ये ग्राहक ३५,००० रुपयांची रोख सवलत, ६,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि २०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस घेऊ शकतात. त्याचवेळी, ZXi आणि ZXi + पेट्रोल मॅन्युअल प्रकारांवर एकूण ५६,००० रुपये, CNG प्रकारांवर ४८,१०० रुपये आणि पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरियंटवर २६,००० रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे.

(हे ही वाचा : गुढीपाडव्याचा मुहूर्तावर घरी आणा टाटाच्या ‘या’ जबरदस्त कार, मिळतोय तब्बल ६५ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट )

२. Maruti Suzuki S Presso

मारुती सुझुकी या महिन्यात S-Presso च्या मॅन्युअल व्हेरिएंटवर ६१,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे, ज्यामध्ये ग्राहक ४०,००० ची रोख सवलत, ६,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि १५,००० रुपयांचे एक्सचेंज बोनस मिळवू शकतात. तर त्याच्या AMT प्रकारावर एकूण ३१,००० रुपयांची सूट मिळत आहे. यासोबतच CNG मॉडेलवर एकूण ४३,१०० रुपयांची सूट दिली जात आहे.

३. Maruti Suzuki Alto K10

मारुती Alto K10 च्या पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटवर एकूण ५७,००० रुपयांची सवलत देत आहे ज्यात ३५,००० रुपयांची रोख सूट, ७,००० कॉर्पोरेट सूट आणि १५,००० एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. AMT व्हेरियंटवर २२,००० रुपये आणि CNG व्हेरिएंटवर ३३,१०० रुपयांची सूट मिळत आहे.

४. Maruti Suzuki Swift

या ऑफर अंतर्गत, मारुती VXi, ZXi आणि ZXi+ ट्रिम्समधील स्विफ्ट मॉडेलच्या मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटवर एकूण ४७,००० रुपयांची सूट देत आहे. यामध्ये रु. २०,००० रोख सवलत, रु. ७,००० कॉर्पोरेट लाभ आणि रु. २०,००० एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. तर त्याच्या LXI व्हेरिएंटवर ३२,००० रुपये आणि CNG व्हेरिएंटवर १७,००० रुपयांची सूट मिळत आहे.

(हे ही वाचा : मार्च महिन्यात भारतात धुमाकूळ घालायला येतायत ‘या’ नवीन बाईक्स, पाहा तुमच्यासाठी कोणती असेल बेस्ट )

५. Maruti Suzuki Celerio

मारुती सेलेरियोच्या सर्व मॅन्युअल प्रकारांवर एकूण ४६,००० रुपयांची सूट उपलब्ध आहे. यामध्ये २५,००० रुपयांची रोख सूट, ६,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि १५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. त्याच्या AMT आवृत्तीवर एकूण २१,००० रुपये आणि CNG आवृत्तीवर एकूण २८,१०० रुपयांची सूट मिळत आहे.

६. Maruti Suzuki Alto 800

Maruti Alto 800 च्या एंट्री-लेव्हल ट्रिमवर फक्त ११,००० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तर त्याच्या टॉप मॉडेलवर एकूण ३६,००० रुपयांची सूट मिळत आहे, ज्यामध्ये १५,००० रुपयांची रोख सूट, ८,००० रुपयांचा कॉर्पोरेट लाभ आणि १५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे. कंपनी आपल्या CNG आवृत्तीवर एकूण ३३,१०० रुपयांची सूट देत आहे.

७. Maruti Suzuki Dzire

ही कार स्विफ्ट सारखीच पॉवरट्रेनसह येते. या महिन्यात, डिझायरच्या AMT आणि MT दोन्ही प्रकारांवर एकूण १७,००० रुपयांची सूट मिळत आहे, तर त्याच्या CNG मॉडेलवर कोणतीही सूट नाही.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 13:22 IST