scorecardresearch

2022 Maruti Suzuki Baleno या कारची बुकिंग डीलरशिपवर सुरू, १० फेब्रुवारीला होणार लॉंच

नवीन कारसोबत नवीन डिझाईनचे अलॉय व्हील मिळणार आहेत, जे बलेनोच्या महागड्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध असतील.

बलेनो फेसलिफ्टच्या केबिनमध्ये देखील मोठे बदल करणार आहे.(photo credit: financial express)
बलेनो फेसलिफ्टच्या केबिनमध्ये देखील मोठे बदल करणार आहे.(photo credit: financial express)

काही दिवसांपूर्वी मारुती सुझुकी कंपनीने २०२२ बलेनो फेसलिफ्टचे उत्पादन सुरू केले असून कंपनीने आता भारतात या प्रीमियम हॅचबॅकची बुकिंग सुरू केली आहे. वेगवेगळ्या डीलरशिपवर वेगवेगळ्या टोकन रक्कमेसह ही कार बुक केली जात आहे,आणि असा अंदाज आहे की १० फेब्रुवारी २०२२ पासून ही कार ग्राहकांना मिळण्यास सुरुवात होईल. डिझाईनमधील बदलांव्यतिरिक्त सर्व नवीन फीचर्स आणि नवीन तंत्रज्ञान बलेनोमध्ये उपलब्ध होणार आहे. कारमध्ये मोठ्या बदलांसह हा अंदाज लावला जात आहे की ह्युंदाई i२० च्या तुलनेत बलेनो खूप पुढे जाण्याची शक्यता आहे. ही कार मारुती सुझुकीची सर्वाधिक विकली जाणारी प्रीमियम हॅचबॅक असणार आहे आणि नवीन मॉडेलसह या विक्रीत मोठी वाढ होणे जवळपास निश्चित असल्याच कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

कारचे बॉनेटही दुसऱ्या डिझाइनचे

नवीन मारुती सुझुकी बलेनोचा चेहरा वक्र ऐवजी सपाट पुढच्या बाजूने बदलणार आहे. यामध्ये नवीन ग्रिलमध्ये हेडलॅम्प आणि दुसर्‍या डिझाईनचे एलईडी डीआरएल असणार आहे. कारचे बॉनेट ग्रिलशी जुळणारे दुसरे डिझाइन देखील असू शकते. याशिवाय, मागील बाजूस मोठे बदल देखील दिसणार आहेत ज्यात नवीन बंपर, पुन्हा डिझाइन केलेले टेलगेट, बूटलिडपर्यंत विस्तारित टेललाइट यांचा समावेश असेल. नवीन कारसोबत नवीन डिझाईनचे अलॉय व्हील मिळणार आहेत, जे बलेनोच्या महागड्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध असतील.

९-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम

या कारच्या बाह्य बदलांव्यतिरिक्त कंपनी नवीन बलेनो फेसलिफ्टच्या केबिनमध्ये देखील मोठे बदल करणार आहे. येथे विद्यमान स्मार्टप्ले स्टुडिओ प्रणालीऐवजी, कंपनी मोठ्या आकाराची नवीन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट प्रणाली देऊ शकते. दरम्यान असा अंदाज आहे की जागतिक बाजारपेठेत विकल्या गेलेल्या नवीन Suzuki S-Cross पासून ते ९ इंच टचस्क्रीन कंपनी नवीन Baleno ला देणार आहे. या वैशिष्ट्यांव्यतिरिक्त मारुती सुझुकी नवीन कारमध्ये एम्बेडेड सिम देऊ शकते, ज्याद्वारे कनेक्टेड कार फीचर्स म्हणजे इंटरनेट-ऑपरेटेड फीचर्स दिली जाऊ शकतात.

कनेक्टेड कार फीचर्स

या नवीन वैशिष्ट्यांसह वायरलेस स्मार्टफोन इंटिग्रेशन देखील मारुती सुझुकी बलेनोमध्ये मिळू शकते. नवीन इन्फोटेनमेंट आणि कनेक्टेड कार फीचर्सनंतर, ऑटो एलईडी हेडलॅम्प, कीलेस एंट्री, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि क्रूझ कंट्रोल यांसारख्या अनेक फीचर्स नवीन बलेनो फेसलिफ्टमध्ये मिळू शकतात. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी त्यात कोणताही बदल करणार नाही अशी शक्यता आहे. सध्याचे १.२-लीटर पेट्रोल इंजिन कारमध्ये मिळू शकते जे ८३ हॉर्सपॉवर आणि ९० हॉर्सपॉवर सौम्य-हायब्रीडमध्ये बनवते. या इंजिनसह, 5-स्पीड मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्सचे पर्याय पूर्वीप्रमाणेच उपलब्ध असणार आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2022 at 17:02 IST

संबंधित बातम्या