मारुती सुझुकी देशातील एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. कंपनीने आपल्या मे महिन्यात झालेल्या गाड्यांच्या विक्रीबद्दल माहिती दिली आहे. भारतातील मोठी कार उत्पादक असणाऱ्या कार कंपनीने मे २०२३ या महिन्यामध्ये एकूण १,७८,०८३ वाहनांची विक्री केली आहे. ज्याची संख्या मे २०२२ मध्ये १,६१,४१३ इतकी होती. या एकूण विक्रीमध्ये १,४५,५९६ युनिट्सची विक्री देशांतर्गत तर ५,०१० युनिट्स मूळ उपकरण (OEMs )उत्पादकांना विकण्यात आले. तर २६ , ४७७ युनिट्सची निर्यात करण्यात आली .

इलेक्ट्रॉनिक घटकांची कमतरतेमुळे वाहनांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे कंपनीने सांगितले. मारूती सुझुकीने आपल्या एका निवेदनामध्ये सांगितले, ”इलेक्ट्रॉनिक घटकांच्या कमतरतेमुळे वाहनांच्या उत्पादनांवर किरकोळ परिणाम झाला. कंपनीने हा परिणाम कमी करण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना केल्या. ” याबबातचे वृत्त बिझनेस टुडेने दिले आहे.

हेही वाचा : कार कंपन्यांचे टेन्शन वाढले! Tata ने लॉन्च केले ‘हे’ मॉडेल, १८० व्हॉइस कमांडसह मिळणार…, एकदा किंमत पहाच

युटिलिटी व्हेईकल सेगमेंटमध्ये मारूती सुझुकीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल्समध्ये ब्रेझा, एर्टिगा, फ्रॉन्क्स, ग्रँड विटारा, एस-क्रॉस आणि XL-6 यांचा समावेश आहे. या सर्व वाहनांच्या ४६,२४३ युनिट्सची विक्री मे २०२३ मध्ये झाली तर. मे २०२२ मध्ये २८,०५१ युनिट्सची विक्री झाली होती. मारूती सुझुकीने यावर्षी इको व्हॅनच्या एकूण १२,८१८ युनिट्सची विक्री केली. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये १०,४८२ युनिट्सची विक्री झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, alto आणि S-Presso ने त्यांच्या मिनी पोर्टफोलिओमध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार्स राहिल्या आहेत. गेल्या महिन्यात कारच्या एकूण १२,२३६ युनिट्सची विक्री झाली. तर गेल्या वर्षी मे २०२२ मध्ये १७,४०६ युनिट्सची विक्री झाली होती. मारूती सुझुकीच्या कॉम्पॅक्ट पोर्टफोलिओमध्ये Baleno, Celerio, Dzire, Ignis, Swift, Tour S आणि WagonR या गाड्यांची सर्वाधिक विक्री झाली आहे. मे २०२३ मध्ये या गाड्यांच्या एकूण ७१,४१९ युनिट्सची विक्री झाली. तर मे २०२२ मध्ये या गाड्यांच्या ६७,९४७ युनिट्सची विक्री झाली होती.