देशातील ऑटो मार्केटमध्ये मागच्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये रेकॉर्डब्रेक विक्री झाली आहे. यात दिवाळी या सणाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ग्राहकांनी विविध ऑफर्सचा लाभ घेत मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. ज्यांना मागच्या महिन्यात ग्राहकांनी भरपूर पसंती दिली आहे. सणासुदीच्या मुहूर्तावर वाहनांच्या झालेल्या विक्रीबाबतची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. देशातल्या प्रमुख वाहन निर्मात्या कंपन्या मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स आणि महिंद्राने विक्रमी विक्री नोंदवली आहे.

प्रमुख कार कंपन्यांच्या विक्रीत झालेली वाढ

मारुती सुझुकी

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेली मारुती सुझुकी वाहन विक्रीत अव्वल ठरली आहे. मारुती सुझुकी इंडियाच्या ठोक विक्रीत नोव्हेंबर २०२२ मध्ये १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या महिन्यात कंनीने १ लाख ५९ हजार ०४४ युनिटची विक्री केली आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये कंपनीने १ लाख ३९ हजार १८४ वाहनांची विक्री केली होती.

ह्युंदाई

ह्युंदाईने नोव्हेंबर २०२२ मध्ये त्याच्या कारची ठोक विक्री ३० टक्क्यांनी वाढून ४८,००३ युनिट्स झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीच्या ३७,००१ युनिट्सची विक्री झाली होती.

(आणखी वाचा : मस्तच! फक्त ७० हजार डाऊन पेमेंटवर खरेदी करा ‘ही’ जबरदस्त कार; किती भरावा लागेल ईएमआय? )

टाटा आणि महिंद्रा

टाटा मोटर्सची विक्री ५५ टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात ४६ हजार ०३७ कारची विक्री केली आहे. गेल्या वर्षी कंपनीने याच महिन्यात २९ हजार ७७८ युनिट्स कार्सची विक्री केली होती. तर महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या विक्रीत ५६ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात ३०,०९२ कार्सची विक्री केली आहे.

किआ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किआ कंपनीने नोव्हेंबर महिन्यात २४,०२५ युनिट्सची विक्री केली आहे. कंपनीच्या विक्रीत ६९ टक्के वाढ झाली आहे. याशिवाय, Kia India, Honda Cars, Skoda आणि MG Motor या कार कंपन्यांनीही गेल्या महिन्यात जबरदस्त विक्री नोंदवली आहे. एवढेच नाही, तर प्रवासी वाहन उद्योगानेही नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंतची चांगली वाढ नोंदवली आहे. मात्र, टोयोटा किर्लोस्कर मोटर आणि निसानच्या विक्रीत घट झाली आहे.