Maruti Suzuki Wagon R Discount: सध्या देशातील ग्रामिणसह शहरातील रस्त्यांवर एका पेक्षा एक अशा सरस आणि अलिशान चारचाकी गाड्या धावताना आपल्याला दिसतात. मग त्या महागातील महाग अशी ऑडी असो की मर्सिडिस (Mercedes). त्या आपल्याला येथे दिसतातच. मात्र आपल्या गावात, शहरात आणि गल्लीत गरिबांची छोटी कार वॅगन आर ही सऱ्हास पहायला मिळते. मागे एकदा कंपनी त्यांच्या फॅमिली कार वॅगन-आर वर ४८,१०० रुपयांची सूट देली होती, परंतु आता त्यांनी ही सूट आणखी वाढवली आहे. आता ग्राहकांना बरेच फायदे मिळणार आहेत. ही कार यावेळी देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे आणि त्यावरील डिस्काउंटमुळे याची विक्री आणखीन वाढेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे आजचा शेवटचा दिवस आहे.

वॅगन आर कारवर मिळत आहे ६३,००० रुपयांची सूट

या महिन्यात तुम्ही मारुती सुझुकी वॅगन-आर वर ६३,१०० रुपयांपर्यंत बचत करू शकता. रिपोर्ट्सनुसार, या कारच्या MY 2024 आणि MY 2025 मॉडेल्सवर ही सूट दिली जात आहे. हे डिस्काउंट २८ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे आज घेता येईल. आज शेवटची संधी असून डिस्काउंटद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशिपशी संपर्क साधू शकतात.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोक सीएनजी कारकडे वळत आहेत. सीएनजी पेट्रोल डिझेलपेक्षा स्वस्त तर आहे. तर मायलेजच्या बाबतीतही उत्तम आहे. WagonR चे CNG मॉडेल 1 किलो गॅसमध्ये 34 किमी पर्यंत मायलेज देते. म्हणजे दिल्लीत सीएनजीवर २ रुपये प्रति किलोमीटर दराने कार चालवता येते. जे पेट्रोलच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. विशेषत: वाहतूक आणि शहरात जेव्हा पारंपारिक इंधन खूप कमी मायलेज देते.

वॅगनआर ही देशातील सर्वात लहान आणि सर्वात कमी किंमतीची कार आहे. पण त्याची विक्री पाहता कंपनीने आपल्या वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये एकामागून एक अनेक फीचर्स दिले आहेत. पॉवर विंडो, इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स सारखे पर्याय कमी किमतीत उपलब्ध असतील. म्हणून आम्ही तिला फुल-मनी कार म्हणू.

वॅगनआरमध्ये आहेत ही जबरदस्त फीचर्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वॅगनआरची एक्स-शोरूम किंमत ५.५४ लाख ते ७.२५ लाख रुपयांपर्यंत आहे. त्यात ५ लोक अगदी आरामात बसू शकतात. यात ७ इंचाचा स्मार्टप्ले स्टुडिओ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. या स्मार्टफोनमध्ये ४-स्पीकरसह नेव्हिगेशन आणि प्रीमियम साउंड आहे. सेफ्टीसाठी, यात दोन एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, हिल होल्ड कंट्रोल आणि मागील पार्किंग सेन्सर सारखी सेफ्टी फीचर आहेत. ही गाडी लहान कुटुंबासाठी परिपूर्ण आहे. मारुती सुझुकी वॅगन आर ही मारुती सेलेरियो, टाटा टियागो आणि सिट्रोएन सी३ शी स्पर्धा करते.