New Maruti Suzuki Dzire: मारुती सुझुकी ही वाहन उत्पादन क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. मारुती सुझुकी ही आधीच तिच्या मायलेजसाठी ओळखली जाते. या कंपनीचा प्रत्येक मॉडेल ग्राहकांच्या पसंतीस उतरतो. मारुती सुझुकी लवकरच थर्ड जनरेशन लाँच करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. याच पार्श्वभूमीवर आता नोव्हेंबरमध्ये मारुती सुझुकीची सर्वात लोकप्रिय कार सेडान अधिकृतरित्या लाँच करणार आहे. या मारुती सुझुकी डिझायरचे फीचर्स आज आपण जाणून घेऊ या.

मारुती सुझुकी डिझायरचे डिझाइन (Next Generation Maruti Suzuki Dzire)

नवीन मारुती सुझुकी डिझायरचे डिझाइन २०२४ च्या स्विफ्टप्रमाणे आहे पण मारुती सुझुकीने सेडानला हॅचबॅकपासून हटके दाखवण्यासाठी गाडीच्या बाहेरचा लूक हटके केला आहे आणि डिझाइनवर मेहनत घेतली आहे.
Financial Express ने दिलेल्या माहितीनुसार, स्विफ्टच्या हनीकॉम्ब ग्रिल ऐवजी नवीन ग्रिल डिझाइन तयार करण्यात आली आहे. ही डिझाइन पाहून तुम्हाला ऑडीच्या सिग्नेचर बवेरिअन बियर्डची आठवण येऊ शकते. डिझायरमध्ये एक बोल्ड स्ट्रीट स्टांस डोअर आहे. ज्यामध्ये एक मस्कुलर बोनट आहे

मारुती सुझुकीने लायटिंग डिझाइनमध्ये बदल केला आहे. नवीन अँगुलर एलईडी हेडलँप आणि एलईडी फोग लँपला पुन्हा डिझाइन करून फ्रंट बम्परमध्ये सेट केले आहे. साइड प्रोफाइलचा एक क्लिअर शोल्डर लाइन, मेटल फिनिश्ड विंडो सिल्स आणि फ्रेश ड्युअल टोन अलॉय व्हिल्ससह वेगळा दिसतो. मागील बाजूच्या डिझाइनला एलईडी टेल लँप आणि त्याच्यावर एका मेटॅलिक पट्टी लावली आहे.

केबिन और फीचर्स (Cabin and Features)

मारुती सुझुकीने डिझायरमध्ये अनेक नवीन फीचर्स आणले आहेत. डिझायरमध्ये सिंगल पॅनल सनरूफ आहे. स्विफ्टप्रमाणे या नवीन डिझायरमध्ये ९ इंचीचे इंफोटेनमेंट सिस्टिम, ऑटोमॅटीक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, ३६० डिग्री कॅमेरा आणि मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्लेचा अॅनालॉग इस्ट्रुमेंट क्लस्टर असू शकते

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विचार केला तर या डिझायरमध्ये सहा एअरबॅग, हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन लेन्स असू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंजिन स्पेसिफिकेशन (Engine Specifications )

नवीन डिझायरमध्ये स्विफ्टपेक्षा १.२ लीटर तीन सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असू शकते. हे इंजिन ८० बीएचपी आणि १११.७ एनएमचा टॉर्क देईल आणि दोन ट्रान्समिशन पर्याय सुद्धा देईल. एक ५ स्पीड मॅन्युअल आणि दुसरी ५ स्पीड एएमटी.