Mukesh Ambani New Car: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या गॅरेजमध्ये अनेक लक्झरी कार आहेत. या उद्योगपतींकडे अनेक महागड्या कार आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या ताफ्यात आता आणखी एका कारची एंट्री झाली आहे. आता अंबानी कुटुंबाने रोल्स रॉयसच्या आलिशान कलेक्शनमध्ये आणखी एक रोल्स रॉयस घोस्ट जोडलं आहे, या कारला नुकतचं खरेदी करण्यात आला आहे.
मुकेश अंबानीची नवी Rolls Royce Ghost दिसली पहिल्यांदा रस्त्यावर
Rolls Royce Ghost मुंबईच्या रस्त्यावर ही कार पहिल्यांदाच दिसली आहे. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे जो CS12 Vlogs नावाच्या चॅनलने अपलोड केला आहे. पहिल्या व्हिडीओमध्ये, नवीन रोल्स रॉयस घोस्ट ट्रॅफिक सिग्नल ओलांडताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये कार इमारतीतून बाहेर पडताना दिसत आहे कार पेट्रा गोल्ड रंगाची असून जी अतिशय आकर्षक दिसत आहे.
(हे ही वाचा : माफिया अतिक अहमदकडे होत्या जीपपासून मर्सिडीपर्यंतच्या आलिशान गाड्या, कुख्यात गुंडाच्या ‘या’ कार्सचं काय होणार?)
Rolls Royce Ghost मध्ये काय आहे खास?
हे Rolls-Royce Ghost चे नवीन पिढीचे मॉडेल आहे जे २०२० मध्ये आणले गेले होते. किमती ६.९५ कोटी रुपयांपासून सुरू होतात आणि ७.९५ कोटी रुपयांपर्यंत जातात. Rolls Royce Ghost भारतात दोन प्रकारात उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिला V12 स्टँडर्ड व्हेरिएंट आहे आणि दुसरा टॉप व्हेरिएंट विस्तारित व्हीलबेस प्रकार आहे ज्याची किंमत ७.९५ कोटी रुपये आहे. व्हिडिओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की अंबानी कुटुंबाने त्याचे टॉप स्पेस एक्सटेंडेड व्हीलबेस प्रकार विकत घेतले आहे. Rolls-Royce Ghost त्याच्या लक्झरीसाठी ओळखले जाते आणि दुसऱ्या पिढीसह, कंपनीने याला पूर्णपणे नवीन स्तरावर नेले आहे. दुसऱ्या पिढीच्या घोस्टला पूर्णपणे नवीन डिझाइन, नवीन प्लॅटफॉर्म आणि चेसिस मिळतात, तर ते अद्ययावत स्टाइलिंग आणि तंत्रज्ञानासह येते.
मुकेश अंबानीकडे महागड्या कारचा भल्लामोठा ताफा
अंबानीकडे महागड्या कारचा भल्लामोठा ताफा आहे. त्यांच्याकडे १४ कोटींची रॉल्स रॉयल कुलिनन आहे. याशिवाय, Mercedes-Benz S600 Guard, BMW 760 Li, Bentley Bentayga, Maserati Levante, Cadillac Escalade सारख्या १७० कारचा त्यांच्या ताफ्यात समावेश आहे.