पुण्यातील इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणारी कंपनी नेक्सझू मोबिलिटी ‘बाजिंगा’ नावाची ई-सायकल बाजारात आणण्यासाठी सज्ज आहे. ई सायकलची किंमत ४९,४४५ रुपये आहे, तर या ई-सायकलचं कार्गो मॉडेल (ज्यात सामान ठेवण्याची सुविधा आहे) त्याची किंमत ५१,५२५ रुपये असेल. कंपनीने शुक्रवारी सांगितले की, बाजिंगा ब्रँडच्या ई सायकल पुढील महिन्यात बाजारात लॉन्च केल्या जातील. इलेक्ट्रिक सायकल कंपनीच्या वेबसाइट आणि सोशल मीडिया हँडलवरून बुक करता येईल. प्री-बुक केल्यानंतर सायकल डिलिव्हरी सुरू होईल.

कंपनीच्या ई-सायकल कोणत्याही सामान्य चार्जिंग सॉकेटमधून चार्ज केल्या जाऊ शकतात. जसे आपण मोबाईल चार्ज करतो अगदी तसंच. ई-सायकलमध्ये सिंगल डिटेचेबल ली-आयन बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की, १५ किलो लोड क्षमतेसह एक मजबूत डिझाइन केलेली मालवाहू सायकल आहे. रायडर्सना लक्षात घेऊन डिझाइन तयार केले आहे. तर डिजिटली डिझाइन केलेली बॉडी त्यास एक फेसलिफ्ट देते. तसेच नेक्सझू मोबिलिटी या ई सायकलवर ईएमआय सुविधा देखील देते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेक्सजूच्या आणखी काही इलेक्ट्रिक सायकल आहेत. यात ई-अर्बन सायकल रोम्पस, ई सुपरसायकल रोम्पस प्लस, आधुनिक ई-सायकल रोडलार्क आणि रोडलार्क कार्गो यांचा समावेश आहे. कार्गो मॉडेल्समध्ये सामान ठेवण्यासाठी एक कॅरिअर दिलं आहे. सामानासाठी मध्यभागी मोठी जागा आहे. या शिवाय दोन इलेक्ट्रिक स्कूटरही बाजारात आहेत. त्यापैकी डेक्स्ट्रो ही लो-स्पीड स्कूटर आहे, तर डेक्स्ट्रो प्लस ही हाय स्पीड स्कूटर आहे.