Ola Cab या कंपनीने २०१७ मध्ये Ola Electric या नव्या विभागाची स्थापना केली होती. बंगळुरूमध्ये स्थित ओला इलेक्ट्रिकद्वारे फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांच्या S1 सीरीजमधील नव्या अपडेटेड ई-स्कूटर्सचे वेरिएंट्स लोकांसमोर सादर केले होते. ओला इलेक्ट्रिकच्या S1 सीरीजमध्ये S1 Air, S1 आणि S1 Pro यांचा समावेश आहे. EV वाहनांची आवड असलेल्या लोकांमध्ये या ई-स्कूटरच्या लॉन्चबाबत मोठी उत्सुकता होती. नुकतंच ओला इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावीश अग्रवाल यांनी कंपनीच्या सर्वात स्वस्त अशा Ola S1 Air ची डिलिव्हरी जुलै महिन्यापासून सुरु होणार असल्याची घोषणा केली.

भावीश यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह या ई-स्कूटरची चाचणी केली. या संबंधित ट्वीट त्यांनी काही दिवसांपूर्वी शेअर केले. त्यात त्यांनी Ola S1 Air बरोबरचा फोटो देखील जोडला. “पहिल्या S1 Air वाहनांची यशस्वी टेस्ट ड्राइव्ह!! जुलैमध्ये तुमच्या भेटीला येत आहे.” असे कॅप्शन त्यांनी ट्वीटला दिले.

Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
byju s starts paying salary of march
‘बैजूज’च्या कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन मार्गी
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर

Ola S1 Air मध्ये 2, 3 आणि 4 kWh बॅटरी पॅकचा समावेश करण्यात आला आहे. एकदा चार्ज केल्यावर ही गाडी अनुक्रमे ८५, १२५ आणि १६५ किमी रायडिंग रेज देतील असा दावा कंपनीने केला आहे. या स्कूटरमध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे तीन रायडिंग मोड आहेत.

Ola S1 Air: परफॉर्मन्स आणि चार्जिंग टाइम

ओला इलेक्ट्रिकच्या S1 Air मध्ये 4.5 kW ची इलेक्ट्रिक मोटर आहे. स्कूटरचा टॉप स्पीड 85 kmph आहे. रेग्यूलर चार्जर वापरुन ४.५ ते ६.५ तासांमध्ये ही स्कूटर पूर्णपणे चार्ज होऊ शकते असा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये MoveOS 3.0 कनेक्टिव्हिटीसह 7.0-इंचाचा TFT टचस्क्रीन डिस्प्ले बसवण्यात आला आहे.

आणखी वाचा – BMW ने लॉन्च केली ‘ही’ शानदार कार; ४.५ सेकंदात पकडते तब्बल १०० किमीचा वेग, जाणून घ्या किंमत

Ola S1 Air ची किंमत

Ola S1 Air ची Ex-showroom किंमत ८४,९९९ ते १.१० लाख रुपये इतकी आहे. या ई-स्कूटरची बुकींग काही महिन्यांपूर्वी सुरु झाली आहे. जुलै २०२३ मध्ये या EV दुचाकीच्या डिलीव्हरीला सुरुवात होणार आहे. ओला इलेक्ट्रिकच्या या स्कूटरमुळे Okinawa, Hero Electric आणि इतर ई-स्कूटर्ससमोर आव्हान निर्माण झाले आहे.