बाईक प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. Royal Enfield चे नेक्स्ट जनरेशन माॅडेल देशात दाखल झाले आहे. तरुणांची या बाईकमध्ये वेगळीच क्रेझ आहे. ही क्रेझ पाहूनच कंपनीने ‘New-Gen Royal Enfield Bullet 350’ लाँच केली आहे. २०२३ रॉयल एनफील्ड बुलेट 350 लाइनअप कंपनीने तीन प्रकारांमध्ये ऑफर केली आहे.

New-Gen Royal Enfield Bullet 3500 इंजिन

नवीन बुलेटला नवीन जे सीरीज इंजिन, ३४९ सीसी सिंगल सिलेंडर, एअर/ऑइल कूल्ड इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्ससह मिळेल. हे ६,१००rpm वर २०.२bhp आणि ४,०००rpm वर २७Nm टॉर्क जनरेट करते. सध्याची बुलेट 350 ही रॉयल एनफिल्डची या जुन्या UCE इंजिनसह येणारी शेवटची बाईक आहे.

यात अपडेटेड सस्पेंशन सेटअप देण्यात आला आहे. टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ट्विन गॅस-चार्ज्ड रिअर शॉक आहेत. एंट्री-लेव्हल व्हेरिएंटला सिंगल-चॅनल ABS मिळते तर मिड-स्पेक आणि अप्पर-ट्रिम्सला ड्युअल-चॅनल ABS मिळते. यात १००-सेक्शन फ्रंट टायर आणि १२०-सेक्शन मागील टायर आहे.

(हे ही वाचा : Hero ची उडाली झोप, होंडाची नवी बाईक देशात दाखल, फीचर्स पाहून व्हाल थक्क, किंमत…)

बाईकची डिझाईन

या बाईकमध्ये किरकोळ डिझाईन बदल करण्यात आला आहे. तसेच नवीन बुलेटमध्ये सिंगल-पीस सीट उपलब्ध आहे. यात नवीन टेल-लॅम्प, चौकोनी आकाराचा बॅटरी बॉक्स आणि नवीन हेडलाईट डिझाईन देण्यात आलं आहे. नवीन जनरेशच्या या बुलेटमध्ये नवीन गोलाकार टेललाइट आणि क्रोम बेझलसह सपाट गोल हेडलॅम्प दिसतील.

या बाईकमध्ये सॉलिड-कलर टँक, ब्लॅक अ‍ॅक्सेंट, इंजिनवर क्रोम आणि मागील ड्रम ब्रेकसह सिंगल-चॅनल एबीएस मिळतो. स्टँडर्ड व्हेरियंटमध्ये अधिक क्रोम आणि गोल्ड 3डी बॅजिंग, क्रोम-फिनिश इंजिन, सिग्नेचर गोल्ड पिनस्ट्रिपिंग, बॉडी-कलर एलिमेंट्स आणि टँक, रिअर डिस्क ब्रेक आणि ड्युअल-चॅनल एबीएस मिळतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन बुलेटची किंमत

या बाईकची किंमत १.७४ लाख रुपये ठेवण्यात आली असून या बाईकची बुकींग ३ सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.