scorecardresearch

Second Hand CNG Cars: ‘या’ आहेत ४ लाखांपेक्षा कमी किमतीत 34kmpl मायलेज देणाऱ्या सीएनजी कार

देशातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या उत्तमोत्तम सीएनजी कार.

Second Hand CNG Cars: ‘या’ आहेत ४ लाखांपेक्षा कमी किमतीत 34kmpl मायलेज देणाऱ्या सीएनजी कार
मायलेजवाली सीएनजी कार. (Photo-financialexpress)

Second Hand CNG Cars: पेट्रोल आणि डिझेल सारख्या इंधनांच्या दरवाढीने (Fuel price hike) सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वाहनांचा खर्च वाचवण्यासाठी ग्राहक पेट्रोल किंवा डिझेलऐवजी इतर इंधनांवर चालणाऱ्या वाहनांकडे वळत आहेत. तुमचीही व्यथा हिच असेल तर तुमच्यासाठी आम्ही सांगत असलेल्या कार उपयुक्त ठरू शकतात. अलिकडच्या काही महिन्यांपासून पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे सीएनजी कार (CNG Car) खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा कल दिसतो आहे. आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या उत्तमोत्तम (Best mileage CNG Cars) सीएनजी वाहनांबद्दल माहिती देत आहोत. ज्या सेकेंड हँड वाहनांच्या बाजारात कमी किंमतही उपलब्ध आहेत.

‘या’ आहेत तीन उत्तमोत्तम CNG Car

2019 Datsun Redi Go T

सेकेंड हँड वाहनांच्या बाजारातून तुम्ही 2019 Datsun Redi Go T (O) मॅन्युअल ही कार स्वस्तात खरेदी करू शकता. कंपनीने 2019 Datsun Redi Go T (O) MANUAL मध्ये CNG किट ऑफर केले नव्हते परंतु काही लोक बाजाराबाहेरून कारमध्ये CNG किट बसवतात. यामध्येही बाहेरील बाजारातून सीएनजी किट बसवण्यात आले होते आणि आता त्याचसोबत ही कार विकली जात आहे.

(हे ही वाचा : ‘या’ इलेक्ट्रिक बाइकच्या प्रेमात पडले भारतीय; अवघ्या दोन तासांतच युनिट्स झाले सोल्ड आउट, बाइकची रेंज 300 किमी )

2018 Maruti Alto

K10 LXI CNG (O) MANUAL कार तुम्ही सेकेंड हँड वाहनांच्या बाजारातून खरेदी कमी किमतीत खरेदी करू शकता. ही कार सीएनजी किटसह येते. हे पेट्रोल इंजिनद्वारे देखील चालते, ज्याला CNG किट देखील मिळते.

2017 Maruti Wagon R

2017 मारुती वॅगन R 1.0 LXI CNG MANUAL ची किंमत रु.३,९७,००० आहे. त्यात सीएनजी किटही मिळते. ही कार पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही पर्यायांसह चालवता येते. ही कार आतापर्यंत ६८,११९ किमीपर्यंती धावली आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2022 at 19:17 IST

संबंधित बातम्या