देशातील कार सेक्टरमध्ये ऑफ-रोड एसयुव्ही सेगमेंट खूपच लहान आहे. ज्यामध्ये फक्त निवडक एसयुव्ही आहेत, परंतु ऑफ-रोड कारचे चाहते लोक मोठ्या संख्येने आहेत. या कार साहसी आणि लांब पल्ल्याच्या ट्रिपला जाणाऱ्या लोकांना तुलनेने जास्त आवडतात. महिंद्रा थार ही ऑफ-रोड एसयूव्ही सेगमेंटमधील एक लोकप्रिय कार आहे. ही या सेगमेंटची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. तुम्हीही जर महिंद्रा थारचे चाहते असाल आणि ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. महिंद्रा थार अवघ्या ४ लाख रुपयांत तुम्ही घरी नेऊ शकता, पाहा नेमकी ऑफर काय आहे ते.

शोरूममधून महिंद्रा थार खरेदी करण्यासाठी तुम्हाला १२.७८ लाख ते १५.०५ लाख रुपये खर्च करावे लागतील, परंतु या ऑफरद्वारे तुम्ही ही कार अर्ध्या किमतीपेक्षाही कमी म्हणजेच अवघ्या ४ लाख रुपयांमध्ये घरी नेऊ शकता. या महिंद्रा थारवरील आजची ऑफर कार क्षेत्रातील माहिती वेबसाइट CARDEKHO ने दिली आहे. त्यांनी या सेकंड हँड कारबद्दल माहिती दिलीय. या कारची किंमत ४ लाख २५ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. जनसत्ताने यासंदर्भात वृत्त दिलंय.

Car Dekho वर दिलेल्या माहितीनुसार, या कारचे मॉडेल २०१४ चे असून ती आतापर्यंत ४५,४९५ किमी धावली आहे. या महिंद्रा थार एसयूव्हीची ही मालकी पहिली आहे आणि तिची नोंदणी दिल्लीतील DL12 RTO कार्यालयात केली गेली आहे.

कंपनीकडून ही कार खरेदी केल्यावर काही अटींसह सहा महिन्यांची वॉरंटी योजना दिली जात आहे, त्यासोबत सात दिवसांची मनी बॅक गॅरंटीही दिली जात आहे. या मनी बॅक गॅरंटीनुसार, तुम्ही ही कार विकत घेतल्यास, त्यात काही दोष आढळल्यास किंवा तुम्हाला ती आवडली नसल्यास तुम्ही ती कंपनीला सात दिवसांत परत करू शकता, त्यानंतर कंपनी संपूर्ण पेमेंट परत करेल. याशिवाय, कंपनी या कारच्या खरेदीवर सहा महिन्यांचा पॅन इंडिया रोड साइड असिस्टन्स प्लॅन आणि आरसी ट्रान्सफर सुविधा देखील देत आहे. याशिवाय जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला ही कार लोनवर घ्यायची असेल तर अशा लोकांना लक्षात घेऊन कंपनी कर्जाची सुविधाही देत ​​आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, कंपनी इतर काही बेनिफीट देखील देत आहे, ज्यामध्ये ५ हजार रुपये शिपिंग शुल्क आकारले जाणार नाही. मोफत आरसी हस्तांतरण सुविधा दिली जाईल आणि कंपनीकडून थर्ड पार्टी विमा देखील दिला जाईल.