SUV Tata Curvv EV Car : देशातील प्रमुख ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने आपली बहुप्रतिक्षित असलेली इलेक्ट्रिक SUV Tata Curvv EV विक्रीसाठी लाँच केली आहे. आकर्षक लूक आणि असंख्य फीचर्ससह या इलेक्ट्रिक SUV ने बाजारात धुमाकूळ घातली आहे. या गाडीची किंमत १७.४९ लाख रुपये आहे.

दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅक

कंपनीने Tata Curvv EV दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. त्यात ५५ kWh आणि ४५ kWh चे दोन बॅटरी पॅक पर्याय म्हणून आहेत. त्याबरोबर फास्ट चार्जिंगचा पर्यायही उपलब्ध आहे. कंपनीच्या मते, १.२ C चार्जिंग टेक्नोलॉजीच्या मदतीने ही कार १५ मिनिटांत इतकी चार्ज होणार की १५० किमीची रेंज देईल. त्याची बॅटरी ७०kW च्या चार्जरने फक्त ४० मिनिटांत १० ते ८० टक्के पर्यंत चार्ज होऊ शकते. पूर्ण चार्ज केल्यावर ही कार ५८५ किमी पर्यंत रेंज देईल.

Top 5 SUVs in July Hyundai Creta SUV
देशातील बाजारात ‘या’ SUV कारनं Punch चं संपवलं वर्चस्व! खरेदीसाठी हजारो ग्राहकांच्या रांगा, किंमत…
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Tata Cars Discounts
Tata Curvv EV देशात दाखल होताच टाटाचा आणखी मोठा धमाका! कंपनीने ‘ही’ घोषणा करताच ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद
Toyota Innova Hycross Bookings Open
मायलेज २४ किमी, तुफान मागणीमुळे कंपनीने बुकिंग बंद केलेल्या ‘या’ ८ सीटर कारचे २ महिन्यानंतर बुकिंग पुन्हा सुरु, किंमत…
royal enfield 350
अखेर प्रतिक्षा संपली! तरुणांची आवडती बाईक ‘या’ दिवशी होणार लाँच; फीचर्स अन् डिझाईन पाहून प्रेमात पडाल
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
What to do if your brakes fail while driving rto officer told easy trick
अचानक गाडीचे ब्रेक फेल झाले तर काय कराल? आरटीओ अधिकाऱ्याने सांगितली सोपी ट्रिक, Video एकदा पाहाच
Maruti Suzuki Fronx SUV Car
टाटा पंच विक्रीत ठरली नंबर-१; पण मारुतीच्या ‘या’ स्वस्त SUV नं मागणीत सर्वांना टाकलं मागे, होतेय जबरदस्त विक्री, किंमत फक्त…

Tata Curvv EV चे व्हेरियंट्स

क्रिएटिव व्हेरियंट ही १७. ४९ लाखमध्ये ४५kwh बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे. अकम्प्लिश्ड व्हेरियंट १८.४९ लाखात ४५kwh बॅटरी पॅकसह आणि १९.२५ लाखात ५५kwh बॅटरीसह उपलब्ध आहे.
अकम्प्लिश्ड+ एस ही ५kwh बॅटरी पॅकसह १८.४९ लाखात उपलब्ध आहे तर ५५kwh बॅटरीसह १९.९९ लाखात उपलब्ध आहे. इम्पॉवर्ड+ ही २१.२५ लाखात उपलब्ध आहे तर इम्पॉवर्ड+ ए ही २१.९९ लाखात उपलब्ध आहे.

हेही वाचा : कमी बजेटमध्ये पूर्ण करा कार खरेदी करण्याचे स्वप्न! Maruti Alto चे मालक व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती

SUV Tata Curvv EV फीचर्स

  • Curvv EV मध्ये अनेक फीचर्स आहेत. यामध्ये कंपनीने १२३ kW क्षमतेची लिक्विड कूल्ड परमनंट मॅग्नेट पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटार वापरली आहे. या SUV मध्ये फक्त ८.६ सेकंदात प्रति तासाने ० ते १०० किमी वेग वाढवण्याची क्षमता आहे.
  • या कारचे केबिन खास बनवण्यासाठी विशेष काम करण्यात आले आहे. यात ६ वे पॉवर ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, प्रीमियम लेदरेट व्हेंटिलेटेड सीट, रिक्लाइन फंक्शनसह दुसरी रो सीट, कस्टमायझेशन सिस्टमसह केबिन मूड लायटिंग, मल्टी-डायल-व्ह्यूसह २६ सेमी चा डिजिटल कॉकपिट आहे. यामध्ये ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग साइट, arcade.ev ची सुविधा देखील आहे जी २० पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्म आणि ॲप्सना सहकार्य करते.
  • टाटा कर्वमध्ये काही हटके फिचर्स आहेत. या कारमध्ये वाहन ते वाहन (V2V) आणि वाहन ते लोड (V2L) फंक्शन देखील यामध्ये दिलेले आहे. V2V च्या मदतीने तुम्ही एक इलेक्ट्रिक कार आणि दुसरी इलेक्ट्रिक कार देखील चार्ज करू शकता. V2L च्या मदतीने तुम्ही तुमच्या कारमधून इलेक्ट्रॉनिक उपकरणांना पॉवर देऊ शकता.
  • टाटाने आपल्या इतर मॉडेल्सप्रमाणे या एसयूव्हीमध्ये सुद्धा सुरक्षा प्रदान केली आहे. यात लेव्हल-२ ॲडव्हान्स्ड ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टीम (ADAS) देण्यात आली आहे. याशिवाय ६ एअरबॅग्ज, ३-पॉइंट ELR सीटबेल्ट, सीट-बेल्ट अँकर प्रिटेन्शनर, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, ३६०-डिग्री सराउंड व्ह्यू कॅमेरा, फ्रंट पार्किंग सेन्सर, स्टॅबिलिटी कंट्रोल प्रोग्राम(ESP), आपत्कालीन ब्रेकिंग, JBL सिनेमॅटिक इफोटेंमेंट सारखे फिचर्स उपलब्ध आहेत.
  • ही कार Arcade.ev तंत्रज्ञानाने परिपक्व आहे. कंपनीने Tata EV Originals सुद्धा लाँच केले आहे. यामुळे आता ग्राहक कंपनीच्या अधिकृत ॲक्सेसरीज सुद्धा खरेदी करू शकतात.
  • ड्रायव्हिंग अधिक आनंददायी बनवण्यासाठी टाटाने जेबीएलचे ९ स्पीकर लावले आहेत. याशिवाय SUVमध्ये मल्टीपल व्हॉइस कमांड सिस्टिम सुद्धा आहे जी देशातील अनेक भाषांमध्ये कमांड घेते. यामध्ये हिन्दी, मराठी, तेलगु आणि बंगाली भाषा आहेत. कर्व एडवांस सुपिरिअर डिजिटल ४ स्पोक स्टीअरिंग व्हिलबरोबर येतो, यामध्ये पेडल शिफ्टर्स, पावर्ड टेलगेट, वायरलेस चार्जरचा सु्द्धा समावेश करण्यात आला आहे.