scorecardresearch

तालिबानने बनवली पहिली ‘सुपरकार’; ‘हे’ फीचर्स पाहून तुम्हीही व्हाल चकित!

तालिबानने एक सुपरकार बनवली आहे. ज्यात टोयोटा कोरोलाचे इंजिन बसवले आहे.

तालिबानने बनवली पहिली ‘सुपरकार’; ‘हे’ फीचर्स पाहून तुम्हीही व्हाल चकित!
तालिबानने बनवली Mada 9 सुपरकार. (Photo-twitter.com/dramitmanohar)

Supercar Unveiled By Taliban In Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये तालिबान यांच्याकडून सत्ता मिळविल्यानंतर तालिबान अनेकदा अनेक अनोख्या बातम्यांमुळे चर्चेत असतो. आता तर एका वेगळ्याच बातमीमुळे तालिबान पुन्हा एकदा चर्चेत आलायं. आता ही चर्चा दहशतवादाशी निगडीत नसून त्यांनी बनविलेल्या सुपरकारची आहे. त्यांनी स्वदेशी कार निर्माण केली आहे. तालिबानने त्या कारला ‘Mada 9’ असे नाव दिल असून या सुपरकारच्या प्रोटोटाइपचे अलीकडेच तालिबानकडून अनावरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ही केवळ एक सामान्य कार नसून एक सुपरकार आहे. आता या कारची जगभरात खूप चर्चा रंगली आहे.

कशी आहे तालिबानची सुपरकार?

तालिबानने या सुपरकारमध्ये टोयोटा कोरोलाचे इंजिन बसवले आहे. अफगाणिस्तानच्या टोलो न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, इंजिनमध्ये अशा प्रकारे बदल करण्यात आले आहेत की ते अधिक वेगाने चालवता येईल. ENTOP या कार विकसित करणाऱ्या कंपनीने भविष्यात कारमध्ये इलेक्ट्रिक पॉवरट्रेन बसवण्याची योजना आखली आहे.

(हे ही वाचा : फक्त 1 लाख भरून घरी आणा तुमची आवडती Tata Punch; महिन्याला भरा ‘इतका’ EMI )

ही कार टायरसह संपूर्ण काळ्या रंगाची आहे. स्पोर्टी लूकसाठी ब्रेक कॅलिपर लाल रंगात ठेवण्यात आला आहे. संपूर्ण डिझाइन स्पोर्ट्स कारसारखे आहे. कारचे टेल लॅम्प दिसायला अतिशय आकर्षक आहेत, हेडलॅम्पसाठी एलईडी दिवे आहेत. कंपनीने कारचे पॉवर आउटपुट उघड केलेले नाही.

कार बनविण्यासाठी किती आला खर्च?

Mada 9 नावाची सुपरकार अजूनही प्रोटोटाइप टप्प्यात आहे. अफगाणिस्तानातील ३० अभियंत्यांच्या टीमने ही कार बनवली असून ते बनवायला पूर्ण ५ वर्षे लागली आहेत. ते बनवण्यासाठी सुमारे ५० हजार अमेरिकन डॉलर्स (४० लाख रुपये) खर्च झाले आहेत. तालिबानचे उच्च शिक्षण मंत्री अब्दुल बाकी हक्कानी यांनी या सुपरकारचे अनावरण केले. ही कार ENTOP नावाच्या कंपनीने बनवली आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2023 at 20:12 IST

संबंधित बातम्या