भारतीय वाहन बाजारात टाटा मोटर्सच्या कार्सची मागणी वाढू लागली आहे. देशात सर्वाधिक प्रवासी कार्सच्या विक्रीच्या बाबतीत ही देशातली तिसरी सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे. या कंपनीच्या कार्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक कार्सवरील वेटिंग पीरियड देखील वाढला आहे. टाटाची देशात सर्वाधिक विकली जाणारी कार नेक्सॉनवर सर्वाधिक वेटिंग पीरियड आहे.

नेक्सॉन एएमटी या मॉडेलसाठी ग्राहकांना १० ते १४ आठवडे वाट पाहावी लागत आहे. तर नेक्सॉनच्या इतर व्हेरिएंट्सवरील वेटिंग पीरियड ८ ते १० आठवडे इतका आहे. टाटा पंच या मायक्रो एसयूव्हीलादेखील बाजारात जोरदार मागणी आहे. पंच कारच्या एएमटी व्हेरिएंटवरील वेटिंग पीरियड ८ ते १० आठवडे इतका आहे. तर पंचच्या इतर व्हेरिएंट्साठी ग्राहकांना ६ ते ८ आठवडे वाट पाहावी लागत आहे.

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
The debut of Bharti Hexacom itself gave investors a return of 43 percent
‘भारती हेक्साकॉम’चा पदार्पणालाच गुंतवणूकदारांना ४३ टक्क्यांचा परतावा
Hero MotoCorp sales
बाकी कंपन्यांची उडाली झोप, Hero ची बाजारपेठेत ‘हिरोगीरी’; विक्रीत मोठी वाढ, बाईक खरेदीसाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा

टियागो, टिगॉर आणि अल्ट्रॉझवरील वेटिंग पीरियड

टाटाची एंट्री लेव्हल कार टियागो हॅचबॅक, कॉम्पॅक्ट सेडान टिगॉर आणि प्रीमियम हॅचबॅक कार अल्ट्रॉझसाठी ग्राहकांना ४ ते ६ आठवडे वाट पाहावी लागत आहे.

हॅरियर आणि सफारीवरील वेटिंग पीरियड किती?

भारतात हॅरियर या मिड साईज एसयूव्हीसाठी ग्राहकांना ६ ते ८ आठवडे वाट पाहावी लागत आहे. तर सफारीच्या बहुतांश व्हेरिएंट्सवर ६ ते ८ आठवडे इतका वेटिंग पीरियड आहे. सर्व आकडेवारी पाहता ग्राहकाला टाटा मोटर्सची कोणतीही कार घ्यायची असेल तर किमान ४ ते १० आठवडे वाट पाहावी लागू शकते.

हे ही वाचा >> Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, सहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

नेक्सॉन, पंच आणि टियागोला जोरदार मागणी

टाटा मोटर्स कंपनी देशात नेक्सॉन आणि पंच या दोन कार्सची तुफान विक्री करत आहे. यासह टियागो या कारलादेखील मोठी मागणी आहे. कंपनीच्या या तीन कार्स देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या वाहनांपैकी आहेत.