टाटा मोटर्स ही देशातील लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नेहमीच नवनवीन मॉडेल्स लाँच करत असते. आता टाटा मोटर्सने वर्षाअखेरीस एक घोषणा केली आहे. भारतीय वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. ही वाढ तीन टक्क्यांपर्यंत होणार आहे, असे टाटा कंपनीकडून सांगण्यात आले आहे. १ जानेवारी २०२४ पासून वाढीव किंमत लागू होईल. यामध्ये प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश असणार आहे. तसेच व्यावसायिक वाहनांच्या संपूर्ण रेंजसाठी हे लागू करण्यात येईल, असे कंपनीने सांगितले आहे. ही घोषणा आज १० डिसेंबर रोजी टाटा कंपनीकडून करण्यात आली आहे.

याआधी मारुती सुझुकी आणि ऑडीसारख्या कार कंपन्यांनीही नवीन वर्षापासून म्हणजेच १ जानेवारी २०२४ पासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती. तसेच आता देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने पुढील वर्षी म्हणजेच १ जानेवारीपासून आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

हेही वाचा…Ertiga ची उडाली झोप, ‘ही’ सात सीटर कार घेण्यासाठी मोठी गर्दी; प्रचंड मागणी पाहून कंपनीला बंद करावं लागलं बुकिंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टाटा कंपनी पुढील वर्षी जानेवारीपासून प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवणार आहेत. उत्पादन खर्च वाढल्यामुळे वाहनांच्या किमतीत ही वाढ करण्यात आली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने आपले मॉडेल आणि किमती वाढवण्यामागे अनेक कारणे दिली आहेत. महागाई आणि वस्तूंच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे, काही दबावामुळे किमती वाढवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. तथापि, कंपनीने पुढे सांगितले की, आम्ही खर्च कमी करण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलत आहोत. मात्र, महागाईमुळे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकंदरीतच १ जानेवारी २०२४ पासून व्यावसायिक वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे