Tata Motors Price Hike: Tata Motors भारतातातील एक लोकप्रिय आणि आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन फीचर्स आणि अपडेटेड कार्स लॉन्च करत असते. तसेच यामध्ये कंपनी ग्राहकांच्या सुरक्षेची देखील तितकीच काळजी घेते. आता टाटा मोटर्सने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. ऑटो कंपनीने कारची किंमत वाढविण्याची घोषणा केली आहे. नवीनतम वाढ पेट्रोल-डिझेल आणि इलेक्ट्रिक कारवर लागू होईल.

टाटाने सर्व मॉडेल्स आणि व्हेरिएंटची किंमत सरासरी ०.६ टक्क्यांनी वाढविली आहे. कंपनीने या किमतीला सामोरे जाण्यासाठी हे वाढविले आहे. १७ जुलै २०२३ पासून ही दरवाढ लागू होणार आहे. वाढलेल्या इनपुट खर्चाचा परिणाम म्हणून ही दरवाढ लागू करण्यात आली असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं.

Mumbai, MHADA, Extends Deadline, E Auction, 17 Plots, Mumbai MHADA, mumbai news, mhada news, marathi news, e auction in mumbai,
मुंबईतील १७ भूखंडांच्या ई-लिलावाच्या निविदेला मुदतवाढ ? एक – दोन दिवसात निर्णय
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

(हे ही वाचा : ५० हजार रुपये पगार असेल तर कोणती कार घ्यायची? AI ने दिले अचूक उत्तर, पाहा काय आहेत पर्याय )

तथापि, कंपनीने ग्राहकांना थोडा दिलासा दिला आहे. याचा फायदा कसा होईल ते पाहूया.

कशी मिळेल सूट

महागड्या किमती टाळण्यासाठी भारतीय ऑटोमोबाईल कंपनीने ग्राहकांना सवलत दिली आहे. जर आपण १६ जुलैपूर्वी कार बुक केली आणि ३१ जुलैपर्यंत डिलिव्हरी केले तर आपल्याला महागड्या किमतीतून सूट मिळेल. Tata Motors ने असा दावा केला आहे की, १६ जुलै पर्यंत बुकिंग आणि ३१ जुलैपर्यंत डिलिव्हरी घेतलेल्या ग्राहकांना नवीन किमतीतून दिलासा देण्यात आला आहे.