Tata Motors ही देशातील अग्रगण्य वाहन उत्पादक कंपनी आहे. नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पो २०२३ सुद्धा टाटा मोटर्सने आपल्या ईव्ही कार लाँच केल्या होत्या. टाटा मोटर्स हे प्रवासी वाहने, ट्रक आणि अन्य प्रकारची वाहने तयार करते. संरक्षण क्षेत्रात देखील टाटा मोटर्स आपले योगदान देत आहे. मात्र जर तुम्ही टाटाच्या कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी अवश्य वाचा.

देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स आपल्या कारच्या किंमती वाढवणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या किंमती लवकरच वाढवण्यात येणार आहेत. तर कोणकोणत्या कारच्या किंमती वाढवणार आहे ते जाणून घेऊयात.

हेही वाचा : Tata Nexon EV Max XM: टाटाने लाँच केली Nexon EV Max XM; जाणून घ्या एकदा चार्ज केली किती धावणार?

वाहननिर्मितीसाठी येणाऱ्या खर्चात वाढ आणि बीएस ६ च्या नियामक बदलांमुळे एकूण खर्चात वाढ झाल्याने वाहनांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. निर्मितीच्या विविध टप्प्यांवर वाढलेला सामग्री खर्च पाहता किंमती वाढविणे भाग ठरले. मात्र ग्राहकांवर कमीत कमी भार पडावा असे प्रयत्न केले गेले आहेत, असेही कंपनीकडून सांगण्यात आले. कंपनी देशांतर्गत बाजारात नेक्सॉन, हॅरियर, सफारी आणि पंच यांसारख्या विविध वाहनांची विक्री करते.

१ फेब्रुवारी २०२३ पासून टाटा मोटर्सच्या कारच्या किंमतीत वध होणार आहे. १ फेब्रुवारीपासून कंपनीच्या कारच्या किंमतीच्या तुलनेत १.२ टक्क्यांनी महाग होणार आहेत. कारच्या मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार या किंमतीत वाढ होणार आहे.

हेही वाचा : फक्त १२ हजारांमध्ये घरी घेऊन या Suzuki ची ‘ही’ जबरदस्त स्कुटर; एका लिटरमध्ये धावणार…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टाटा मोटर्स भारतीय बाजारपेठेत पेट्रोल, डिझेल , सीएनजी आणि इलेक्ट्रिक प्रकारांमध्ये कारची विक्री करते. मात्र १ फेब्रुवारीपासून ज्या कारच्या किंमती वाढणार आहेत त्यात ICE सेगमेंटच्या कारचा समावेश आहे.. सध्या कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटच्या कारच्या किंमतीत वाढ करत नाही आहे.