scorecardresearch

टाटा मोटर्सला मागच्या तिमाहीत तोटा; ‘या’ दोन कारणांमुळे बसला फटका

टाटा मोटर्सने आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली आहे. ऑक्टोबर २०२१ ते डिसेंबर २०२१ या तिमाहीत कंपनीला १,४५१.०५ कोटींचा तोटा झाला आहे.

TATA
टाटा मोटर्सला मागच्या तिमाहीत तोटा; 'या' दोन कारणांमुळे बसला फटका

आर्थिक वर्ष २०२१-२२ या वर्षातील चौथा आणि शेवटचा तिमाहिचा टप्पा सुरु आहे. एप्रिल ते जून, जुलै ते सप्टेंबर, ऑक्टोबर ते डिसेंबर आणि जानेवारी ते मार्च असे तिमाहीचे चार टप्पे आहेत. नुकतीच टाटा मोटर्सने आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली आहे. ऑक्टोबर २०२१ ते डिसेंबर २०२१ या तिमाहीत कंपनीला १,४५१.०५ कोटींचा तोटा झाला आहे. मागच्या आर्थिक वर्षातील या कालावधीतील तिमाहित कंपनीला २,९४१.४८ कोटी रुपयांचा नफा झाला होता. टाटा मोटर्सच्या कामकाजातून तिस-या तिमाहीत एकूण महसूल ७२,२२९.२९ कोटींवर पोहोचला आहे, जो मागील वर्षीच्या तिमाहीत ७५,६५३.७९ कोटी होता. दुसरीकडे कंपनीने स्टँडअलोन आधारावर १७५ कोटींचा नफा झाल्याचं नमूद केलं आहे.

२०२०-२१ च्या तिसऱ्या तिमाहीत ६३८.०४ कोटींच्या निव्वळ तोट्याच्या तुलनेत पुनरावलोकनाधीन कालावधीत तोटा ८५ कोटी इतका होता. कंपनीने असेही म्हटले आहे की, तिसर्‍या तिमाहीत ऑपरेशन्समधून कमावलेली कमाई १२,३५२.७८ कोटी होती. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत ९,६३५.७८ कोटी होती.

Lamborghini ने अनेक आलिशान गाड्या विकत भारतात रचला इतिहास

टाटा मोटर्सची प्रिमियम कार असलेल्या जग्वार लँड रोव्हरच्या किरकोळ विक्री मागील वर्षाच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत ३७.६ टक्क्यांनी घसरली. असं असलं तरी उत्पादनात ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे तसेच मोटारींच्या वाढत्या किमतीमुळे हा तोटा झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे सेमीकंडक्टरच्या कमतरतेचा फटका बसल्याचं कारण पुढे आलं आहे. “चिप संकटाचा सामना या वर्षीही करावी लागण्याची शक्यता आहे. पण हळूहळू होईल”, असं टाटा मोटर्स कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. जग्वार लँड रोव्हरने सांगितले की, दीर्घकालीन पुरवठा सुरक्षित करण्यासाठी प्रथम-स्तरीय पुरवठादार आणि चिप निर्मात्यांसोबत काम करत आहे. कंपनीच्या विधानानुसार, जेएलआरला चौथ्या तिमाहीत सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि नफ्यात सुधारणा अपेक्षित आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tata motors posts rs 1451 crore consolidated net loss third quarter rmt

ताज्या बातम्या