scorecardresearch

Auto Sales January 2023: टाटा मोटर्सच्या ‘या’ शानदार कारच्या मागे लागले भारतीय, विक्रीत केली रेकॉर्डब्रेक कामगिरी

टाटा मोटर्सच्या वाहनांना देशात सर्वाधिक पसंती मिळत असते.

Tata Nexon
टाटा मोटर्सची जानेवारीत ४८ हजार गाड्यांची विक्री (Photo-financialexpress)

Tata Car Sales January 2023: टाटा मोटर्सने जानेवारी २०२३ साठी विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. कंपनीने गेल्या महिन्यात ४८,२८९ मोटारींची विक्री केली आणि प्रवासी वाहनांच्या विक्रीत तब्बल १८ टक्के वाढ नोंदवली. कंपनीने गेल्या वर्षी याच महिन्यात ४०,९४२ कारची विक्री केली होती.

टाटा मोटर्सने व्यावसायिक आणि प्रवासी अशा एकूण ८१,०६९ वाहनांची विक्री केली आहे. जे गेल्या वर्षीच्या जानेवारीमध्ये विकल्या गेलेल्या ७६,२१० वाहनांपेक्षा ६.४ टक्के जास्त होते. टाटा मोटर्सची सब ४ मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही टाटा नेक्सॉन इंडियन मार्केटमध्ये सर्वात जास्त विकणारी एसयूव्ही आहे. याशिवाय, पंच, अल्ट्रोज, टियागो, टिगोरसह अन्य कारची चांगली विक्री झाली आहे.

(हे ही वाचा: तुमची इलेक्ट्रिक कार जास्त रेंज देत नाही का? ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा, वाहन पळेल सुसाट )

टाटा मोटर्सने १ फेब्रुवारी २०२३ पासून त्यांच्या प्रवासी वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने कारच्या किमतीत १.२ टक्क्यांनी वाढ केली आहे. कारच्या मॉडेल आणि प्रकारानुसार भाडेवाढ होईल. कंपनी लवकरच आपल्या वाहनांच्या नवीन किंमती जाहीर करू शकते. कंपनीने कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमतीमुळे किंमती वाढल्या आहेत.

या वर्षी कंपनी आपल्या सध्याच्या वाहनांचे काही नवीन मॉडेल लॉन्च करू शकते. कंपनीने ऑटो एक्सपो 2023 मध्ये काही नवीन CNG आणि इलेक्ट्रिक कारचा खुलासा केला. २०२३ मध्ये, कंपनी पंचची CNG आवृत्ती तसेच Tata Altroz ​​ची इलेक्ट्रिक आवृत्ती लॉन्च करू शकते. याशिवाय, कार निर्मात्याने ऑटो एक्सपोमध्ये Tiago EV, Tiago EV Blitz चे स्पोर्टी अवतार देखील अनावरण केले.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 14:39 IST